शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या शाळांसाठी आता अक्षयपात्र योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 01:43 IST

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार मिळावा, यासाठी आता एका खासगी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अक्षयपात्र योजना राबविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून शुद्ध तुपातील चांगले सकस आणि चविष्ट पदार्थ २३ हजार मुलांना मिळणार आहे.

ठळक मुद्देदर्जेदार पोषण आहार : लवकरच होणार अंमलबजावणी

नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार मिळावा, यासाठी आता एका खासगी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अक्षयपात्र योजना राबविण्यात येणार आहे. त्या माध्यमातून शुद्ध तुपातील चांगले सकस आणि चविष्ट पदार्थ २३ हजार मुलांना मिळणार आहे.महापालिकेचे शिक्षण मंडळाचे नूतन प्रशासनाधिकारी उदय देवरे यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात एका खासगी संस्थेने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र दिले आहे. त्याचा अभ्यास करून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.शासनाच्या धोरणानुसार महापालिकेच्या ९० शाळांमधील २३ हजार विद्यार्थ्यांना बचत गटांमार्फत आहार दिला जातो. मात्र, बंगळुरू, दिल्ली आणि ठाणे यांसह विविध भागात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या धर्तीवर या संस्थेच्या माध्यमातून चविष्ट सकस आणि गरम भोजन देण्याचा प्रस्ताव संबंधित संस्थेने मांडला आहे. सुधा मूर्ती यांच्या प्रेरणेने गेल्या पंधरा वर्षांपासून बंगळुरूसह अनेक भागात याप्रकारे प्रकल्प राबविला जात आहे. नाशिकमध्ये सेंट्रल किचनच्या माध्यमातून अशाप्रकारे अक्षयपात्र योजना राबविण्यासाठी यापूर्वी प्रयत्न झाले होते, मात्र त्यावेळी बचत गटांच्या रोजगारावर गंडांतर येईल म्हणून या योजनेला विरोधही झाला होता. परंतु आता मात्र ही योजना राबविताना बचत गटांना सामावून घेऊन योजना राबविली जाणार आहे. संंबंधित संस्थांच्या अधिकाºयांनी तयारी दर्शविली आहे. शासकीय अनुदानापेक्षा जास्त रक्कम खर्च करून संंबंधित सेवाभावी संस्था पोषण आहार पुरवणार आहे. त्यादृष्टीने महापालिका आयुक्त प्रयत्न करीत आहेत.पटसंख्या वाढीसाठी उपआयुक्तमहापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सध्या विविध महिला बचत गटांच्या माध्यमातून खिचडी आणि तत्सम आहार दिला जातो. परंतु अक्षयपात्र सारखी योजना राबविल्यास आणखी मुलांची संख्या वाढू शकते, असा प्रशासनाला विश्वास वाटत आहे त्या दृष्टिकोनातून ही योजना राबविली जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण