शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

आता बांधकामाचे प्रस्ताव आॅफलाइन स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:17 IST

विकासक, वास्तुविशारद आणि पर्यायाने नागरिकांची डोकेदुखी ठरलेल्या आॅटोडीसीआर आॅनलाइन सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू झाली असून, संबंधित कंपनीला तीन दिवसांची मुदत देण्यात येणार आहे.

नाशिक : विकासक, वास्तुविशारद आणि पर्यायाने नागरिकांची डोकेदुखी ठरलेल्या आॅटोडीसीआर आॅनलाइन सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू झाली असून, संबंधित कंपनीला तीन दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर थेट कारवाई करीत काम बंद करून आॅफलाइन पद्धतीने म्हणजे पूर्वीप्रमाणेच बांधकाम प्रस्ताव स्वीकारण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम परवाने अधिक द्रुतगतीने मिळावे, पारदर्शकता रहावी आणि नियमांचे अचूक पालन व्हावे यासाठी दोन वर्षांपूर्वी आॅटोडीसीआर सॉफ्टवेअर आणण्यात आले, परंतु त्यातून वेग वाढण्यापेक्षा वेग मंदावला जात असल्याने सारेच त्रस्त झाले होते. परंतु आॅटोडीसीआरला विरोध म्हणजेच पारदर्शकता नको अशीच भूमिका प्रशासनाकडून सातत्याने घेतली गेली. विलंबाने मिळणारी मंजुरी अथवा रिजेक्शन, त्यातच पुन्हा पुन्हा भरावे लागणारे तपासणी शुल्क आणि जी प्रकरणे मंजूर होतात त्यांचीदेखील पीडीएफ फाईल मिळत नसल्यानेच सारेच हैराण झाले होते. महापालिकेच्या नगररचना विभागालादेखील कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागले होते. परंतु तरीही यापूर्वीचे आयुक्त हे सॉफ्टवेअरच्या बाजूनेच होेते.नवीन सॉफ्टवेअर येणारमनपाची बांधकाम नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०१७ मध्ये मंजूर झाली होती. त्यानंतर या नियमावलीचा अंतर्भाव करून आॅटोडीसीआर सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते. आता राज्य शासनाने सर्व शहरांसाठी एकच सामाईक बांधकाम नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीपीआर) तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पुढील महिन्यात ते लागू होण्याची शक्यता असून, तसे झाल्यास नवीन सॉफ्टवेअर वापरण्यात येणार आहे. बहुधा शासनाच्या माध्यमातून हे सॉफ्टवेअर दिले जाणार असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाonlineऑनलाइन