शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नववीची पुस्तके बाजारात अनुपलब्ध

By admin | Updated: June 11, 2017 00:47 IST

९ वीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके अजूनही बाजारात उपलब्ध होत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे

 साहेबराव अहिरे । लोकमत न्यूज नेटवर्कपाथर्डी फाटा : अवघ्या चार-पाच दिवसांत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरु वात होणार असून, ९ वीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके अजूनही बाजारात उपलब्ध होत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. बालभारतीच्या ढिसाळ नियोजनामुळे पुस्तके बाजारात यायला उशीर होत असून, सर्व माध्यमांची सर्व पुस्तके तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी पालक, विद्यार्थी व शिक्षकांकडून होत आहे. सध्या मराठी माध्यमाची केवळ पाचच पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. इतर माध्यमांची आणि मराठी माध्यमाच्या भाषा विषयांच्या पुस्तकांची सर्वांना प्रतीक्षा आहे. नवीन बालभारतीकडे इयत्ता ८ वी पर्यंतच्या पुस्तकांचा निर्मिती साठा व वितरणाची जबाबदारी होती. यावर्षी नववीच्या क्रमिक पुस्तकांचीही जबाबदारी बालभारतीने घेऊनही अद्यापपर्यंत ९ वीची सर्व पुस्तके बाजारात विक्र ीसाठी खुली न केल्याने पालक, विद्यार्थी व शिक्षक संभ्रमात आहेत. येत्या १५ जूनला सर्वत्र शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. ९ वीला १० वी च्या तयारीचे वर्ष म्हणून विद्यार्थी व शिक्षक अधिक महत्त्व देतात. तयारीला अधिक वेळ मिळण्यासाठी बहुसंख्य शाळा ९ वीचा अभ्यासक्र म लवकर संपवून वार्षिक परीक्षाही लवकर घेतात. जेणेकरून विद्यार्थ्यांची अधिक तयारी करून घेता येईल. या पार्श्वभूमीवर ९ वीच्या सर्व माध्यमांची सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध होणे गरजेचे होते. सध्या बाजारात एसएससी बोर्ड मराठी माध्यमाची तिन्ही भाषा विषय, सेमी इंग्रजी माध्यमाची व इंग्रजी माध्यमाची सर्व पुस्तके उपलब्ध नाहीत.