शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

पॉसचा वापर न करणाऱ्या रेशन दुकानदारांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:18 IST

रेशनवरील धान्य वितरणात पॉस यंत्राचा वापर न करणाºया जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची माहिती संग्रहित करून त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली असून, मुदतीत आपले म्हणणे समाधानकारक न मांडल्यास अशा दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही करण्याची तयारी पुरवठा खात्याने सुरू केली आहे.

नाशिक : रेशनवरील धान्य वितरणात पॉस यंत्राचा वापर न करणाºया जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची माहिती संग्रहित करून त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली असून, मुदतीत आपले म्हणणे समाधानकारक न मांडल्यास अशा दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याची कार्यवाही करण्याची तयारी पुरवठा खात्याने सुरू केली आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यातच पॉस यंत्राचा वापर कमी झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे असून, त्यासाठी पुरवठा खात्याची तांत्रिक प्रणाली दोषी असल्याचा दावा केला जातआहे.संपूर्ण राज्यात गेल्या वर्षापासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील काळाबाजाराला आळा बसावा म्हणून रेशन दुकानातून धान्य वाटप करताना पॉस यंत्राचा वापर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. राज्यातील काही भागांत टप्पाटप्प्यात राबविण्यात आलेल्या पॉस यंत्रामार्फत धान्य वाटपात गेल्या सात महिन्यांत सातत्याने पॉस वापराच्या प्रमाणात कमालीची वाढ होत असतानाच, आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळात रेशन दुकानदारांकडून पॉस यंत्राचा वापर कमी होऊ लागला असून, त्यामुळे रेशनमध्ये धान्य पडून राहत असल्याचे तर काही दुकानदारांनी मॅन्युएली पद्धतीने धान्य वाटपाला प्राधान्य दिल्याची बाब पुरवठा खात्याच्या निदर्शनास आली आहे.नागरिकांचे स्थलांतर, तांत्रिक दोष कारणीभूतपुरवठा खात्याच्या नोटिसांबाबत रेशन दुकानदारांनीही आपली बाजू मांडण्याची तयारी केली असून, ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांनी रोजगाराच्या शोधासाठी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे अजूनही शिधापत्रिकेला आधारकार्डाशी जोडण्याची संगणकीय प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे अनेक शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा दावा केला आहे.पुरवठा खात्यात पुन्हा अस्वस्थतारेशन दुकानदारांकडून धान्य वाटपात होत असलेल्या कमतरतेमुळे पुरवठा खात्यात पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रत्येक दुकानदाराकडून आॅनलाइन वाटप होत असलेल्या धान्याची माहिती पुरवठा खात्याच्या सर्व्हरमध्ये दिसत असल्याने पुरवठा खात्याने आता पॉस यंत्राचा वापर न करता धान्य वाटप करणारे व धान्य वाटप कमी करणाºया दुकानदारांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक