शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी‘च्या सक्तीच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना नोटिसा

By श्याम बागुल | Updated: September 8, 2018 17:01 IST

नाशिक जिल्ह्यातील ४९ गावांमधून जाणा-या समृद्धी महामार्गासाठी सुमारे १२०० हेक्टर जागेची निकड असून, त्यापैकी ८७ टक्केजमीन शेतक-यांच्या संमतीने थेट खरेदीने रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात मिळाली

ठळक मुद्दे८७ टक्के जागा ताब्यात : संमती देणा-यांना मिळणार पाचपट मोबदलासमृद्धी महामार्गासाठी सुमारे १२०० हेक्टर जागेची निकड

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देण्यास नकार देणा-या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील सुमारे दीड हजार शेतक-यांची सहाशे हेक्टर जागा सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असून, त्यासाठी शेतक-यांना नोटिसा बजावण्याची तयारी सुरू झाली आहे. नोटीस बजावल्यानंतरही जमीन देण्यास संमती दर्शविणा-या शेतक-यांना पाच पट मोबदला दिला जाईल, मात्र ज्यांनी नोटिसीला प्रतिसाद दिला नाही, अशांच्या जमिनी संपादित करून मोबदल्याची रक्कम थेट न्यायालयात जमा करण्यात येणार आहे.नाशिक जिल्ह्यातील ४९ गावांमधून जाणा-या समृद्धी महामार्गासाठी सुमारे १२०० हेक्टर जागेची निकड असून, त्यापैकी ८७ टक्केजमीन शेतक-यांच्या संमतीने थेट खरेदीने रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात मिळाली आहे. त्यात सिन्नर तालुक्यातील ८१ टक्के, तर इगतपुरी तालुक्यातील ९० टक्के जमिनीचा समावेश आहे. परंतु अजूनही १३ टक्के जागा शेतकरी देत नसल्याने शासनाने सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला असून, तशी अंतिम अधिसूचनाही काढण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील बहुचर्चित शिवडे, घोरवडसह आदी गावांमध्ये समृद्धी महामार्गासाठी अनेक दिवस आंदोलने झाल्यामुळे तेथील जागा मोजणीची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. परिणामी शासनाने दिलेल्या मुदतीत सिन्नर तालुक्यात जागा खरेदी करण्यात विलंब झाल्याने सुमारे ३७५ गटांतील ११०० हून अधिक शेतकºयांना सक्तीच्या भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या शेतकºयांनी संमती दिली तर बाजारभावाच्या पाचपट रक्कम देऊन ती खरेदी केली जाईल, मात्र ज्यांनी जागा दिली नाही, तर ती सक्तीने संपादित करून मोबदल्याची रक्कम थेट न्यायालयात जमा करण्यात येणार आहे. इगतपुरी या आदिवासी तालुक्यातील बहुतांशी गावे पेसा क्षेत्रातील असल्यामुळे तेथील जागा ताब्यात घेण्यास कायदेशीर बाबींमुळे विलंब झाला होता. आता तो अडसर दूर झाल्याने सोमवारी सक्तीच्या भूसंपादनासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतर साधारणत: २०० गटातील ४०० शेतकºयांना नोटिसा देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक