शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील वायनरी, लॉन्स, हॉटेल्सचालकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 01:14 IST

शहरातील जागांचे वाढलेले दर लक्षात घेता, नाशिक शहर व लागनूच असलेल्या भागात शेतजमिनींचा विनापरवाना व्यावसायिक वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध महसूल खात्याने मोहीम उघडली

नाशिक : शहरातील जागांचे वाढलेले दर लक्षात घेता, नाशिक शहर व लागनूच असलेल्या भागात शेतजमिनींचा विनापरवाना व्यावसायिक वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध महसूल खात्याने मोहीम उघडली असून, गेल्या दोन दिवसांत गंगापूर शिवारातील प्रसिद्ध वायनरी, धरणालगतचे बंगले, लॉन्स, हॉटेल्सचालकांच्या जागेचा पंचनामा करून नाशिक तहसील कार्यालयाने त्यांच्या विरुद्ध ४० पट दंडाची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे बिनशेती न करणाºया व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, दुसरीकडे ४० पट व त्यापेक्षाही अधिक दंड वसूल करण्यावर महसूल खाते ठाम आहे.  नाशिक महापालिका हद्दीत व हद्दीला लागून असलेल्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वायनरी, हॉटेल्स, रिसॉर्ट, शाळा, लॉन्सचे पेव फुटले असून, नियमानुसार महसूल खात्याकडून या जागेचा अकृषक वापर करण्यासाठी म्हणजेच बिनशेतीचा व्यावसायिक वापर करण्यासाठी एनए करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकीय शुल्क भरणे क्रमप्राप्त आहे. परंतु बºयाचशा जागा मालकांनी त्याकडे दुर्लक्ष करून मोक्याच्या जागांचा थेट व्यावसायिक वापर सुरू करून वर्षानुवर्षे बख्खळ कमाई करीत असल्याची बाब महसूल खात्याच्या लक्षात आल्याने नाशिक तहसील कार्यालयाने शहरातील अशा प्रकारच्या जागा शोधण्यास सुरुवात केली आहे. विशेष करून गंगापूररोड, त्र्यंबकरोड, औरंगाबादरोडवर मोठ्या प्रमाणावर विविध व्यवसाय थाटण्यात आल्याने ते शोधण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकाºयांचे पथक गठित करण्यात आले आहे.या पथकाने गेल्या आठवड्यात शोध मोहीम सुरू केली असून, त्याची सुरुवात गंगापूर, गोवर्धन शिवारापासून करण्यात आली. त्यात गंगापूर शिवारातील सुला वाइन, सोमा वायनरी, साधना भेळ, केनिंग्स्टन, परफेक्ट मार्केट, पाथर्डी शिवारातील पाठीमागील बाजूस एका धरणाच्या पायथ्याशी असलेले बंगले, जुना आग्रारोडवरील संशोधन केंद्र, ठक्कर लॉन्स आदी सुमारे वीस तेपंचवीस व्यावसायिकांच्या जागांचे मोजमाप करून त्यांनी केलेल्या वापराच्या क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत.महसूल खात्याची ही मोहीम सुरूचजमीन महसूल अधिनियमान्वये अकृषक वापर करणाºयांना ४० पट दंडाची तरतूद कायद्यात असून, त्यानुसार तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी व्यावसायिकांना नोटिसा पाठविल्या आहेत. महसूल खात्याची ही मोहीम सुरूच राहणार असून, आता शहरातील मध्यवस्तीत उभारण्यात आलेल्या इमारतींचा मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वापर केला जात असल्याने लवकरच अशा इमारती व त्यातील कार्यालयांभोवती दंडाचा फास आकारण्यात येणार आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयbusinessव्यवसाय