शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना वेतनकपातीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:11 IST

नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही त्याप्रमाणात वसुली होत नसल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये करण्यात आलेल्या ठरावानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कर्मचाऱ्यांना वसुली न केल्यास ५० टक्केवेतनकपात करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

ठळक मुद्देपाणीपट्टी वसुली : ग्रामपंचायतींकडे ११ कोटी थकीत

नाशिक : नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही त्याप्रमाणात वसुली होत नसल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये करण्यात आलेल्या ठरावानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कर्मचाऱ्यांना वसुली न केल्यास ५० टक्केवेतनकपात करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. दुसरीकडे या कर्मचाºयांनी आपण तांत्रिक कर्मचारी असून, पाणीपट्टी वसुलीचे आमचे काम नसल्याचा दावा करून, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावे, अशी मागणी केली आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा, दाभाडी व १२ गावे, देवळा व दहा गावे अशा तीन योजना राबविल्या जात असून, या तिन्ही योजनांपोटी ११ कोटी ३४ लाखांची पाणीपट्टी नांदगाव नगरपालिका, दाभाडी व देवळ्याच्या ज्या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो त्यांच्याकडे थकली आहे. दरवर्षी थकबाकीची रक्कम वाढत जात असल्याने त्याचा बोजा जिल्हा परिषदेवर पडत आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेकडून सात ते दहा कोटी या योजनेवर खर्च केले जातात, परंतु वसुली होत नसल्याने जिल्हा परिषदेचे नुकसान होत असल्याची भावनासभेत सदस्यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती.कर्मचाºयांचे जि.प. अध्यक्षांना निवेदनमंगळवारी कर्मचाºयांनी एकत्र येत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना निवेदन दिले असून, त्यात पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन, व्हॉल्व्ह, एअर व्हॉल्व्ह व विविध कामांची देखभाल, दुरुस्ती करण्याचे काम नियमित करीत आहेत. त्याचबरोबर संबंधित ग्रामपंचायतींना वेळोवेळी भेट देत पाणीपट्टी वसुलीबाबत ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंचांना जाणीव करून दिले जाते. सदरचे कर्तव्य स्वत:हून बजावत असल्यामुळे वेतन कपात करू नये, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकzpजिल्हा परिषद