शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या मिळकतींनाही नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:47 IST

महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी मोठ्या उत्साहाने काम करणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाने आता एकही मिळकत करवसुलीशिवाय ठेवायची नाही? असा निर्धार केला असून, त्या अंतर्गत शहरातील खासगी मिळकती, देवस्थान इतकेच नव्हे पालिकेच्याच समाजमंदिरे आणि अंगणवाड्यांनादेखील नोटिसा बजावण्याचा सपाटा लावला आहे. स्वमालकीच्या इमारतींनाच नोटिसा देण्याच्या पालिकेच्या प्रामाणिकपणाची नगरसेवकांच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

नाशिक : महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी मोठ्या उत्साहाने काम करणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाने आता एकही मिळकत करवसुलीशिवाय ठेवायची नाही? असा निर्धार केला असून, त्या अंतर्गत शहरातील खासगी मिळकती, देवस्थान इतकेच नव्हे पालिकेच्याच समाजमंदिरे आणि अंगणवाड्यांनादेखील नोटिसा बजावण्याचा सपाटा लावला आहे. स्वमालकीच्या इमारतींनाच नोटिसा देण्याच्या पालिकेच्या प्रामाणिकपणाची नगरसेवकांच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. घरपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रयत्न सुरू केले आणि यंत्रणेला कामाला लावले आहे. यंदा कधी नव्हे ते मार्च एन्डिंगनंतरदेखील पालिकेच्या वतीने थकीत करवसुलीसाठी कारवाई कायम ठेवली असून, टॉप फिफ्टी मिळकतींचा लिलाव येत्या २५ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.याशिवाय यंदा प्रथमच ९० कोटी रुपयांची घरपट्टी वसूल झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कारभारी उत्साहात असून, याच उत्साहाच्या भरात एकही मिळकत न वगळता नोटिसा बजावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्या अंतर्गत शहरातील अनेक देवस्थाने, महपाालिकेच्या मालकीची समाजमंदिरे आणि इतकेच नव्हे तर अंगणवाड्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. महापालिकेने बांधलेली समाजमंदिरे ही विविध सेवाभावी संस्थांना देखभाल दुरुस्ती तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी देण्यात आली आहेत. अशा संस्थांना त्याच समाजमंदिराच्या घरपट्टी भरण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही मंदिरे आणि धर्मस्थळांनादेखील नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांनी परिसरातील नगरसेवक तसेच आमदारांकडे धाव घेतली आहे. अनेक समाजमंदिरे हे संबंधित मंडळांकडून व्यावसायिक कारणासाठी वापरली जातात, असा प्रशासनातील अधिकाºयांचा दावा आहे. मात्र, महापालिकेने स्वत:तच बांधलेल्या आणि महापालिकाच संचलित करीत असलेल्या अंगणवाड्यांनादेखील नोटिसा बजावल्या असून, संबंधित अंगणवाडी सेविका बुचकळ्यात पडल्यात आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका