बागलाण तालुक्यात एक हजार बोगस लाभार्थींना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 08:37 PM2020-11-19T20:37:51+5:302020-11-19T20:38:31+5:30

सटाणा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या बागलाणमधील तब्बल १ हजार ३७ शेतकऱ्यांना संबंधित विभागाने अपात्र ठरविले असून, त्यांना एकूण एक कोटी ५४ हजार रुपये वसुलीच्या नोटिसा बजावल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Notice to one thousand bogus beneficiaries in Baglan taluka | बागलाण तालुक्यात एक हजार बोगस लाभार्थींना नोटिसा

बागलाण तालुक्यात एक हजार बोगस लाभार्थींना नोटिसा

Next
ठळक मुद्देपीएम किसान सन्मान निधी योजनेची एक कोटीची वसुली

नितीन बोरसे
सटाणा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या बागलाणमधील तब्बल १ हजार ३७ शेतकऱ्यांना संबंधित विभागाने अपात्र ठरविले असून, त्यांना एकूण एक कोटी ५४ हजार रुपये वसुलीच्या नोटिसा बजावल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शासनाने सन २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबास वार्षिक तीन समान हप्त्यांमध्ये ६००० रुपयांचे अनुदान देण्यात येते. बागलाण तालुक्यात तब्बल एक लाखाहून अधिक खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी ५८ हजार शेतकऱ्यांना शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळाला आहे.
या योजनेचा सर्वाधिक फायदा कोरोनाच्या महासंकट काळात गरीब शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही योजना दिलासादायक ठरली. दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर महसूल यंत्रणेने अचानक बागलाण तालुक्यातील १ हजार ३७ लाभार्थी शेतकऱ्यांना अपात्र ठरवून वसुलीसाठी नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतला; परंतु या योजनेच्या निकषाप्रमाणे लाभ घेतलेले शेतकरी अपात्र असल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.

हे ठरले अपात्र......
नोकरदार आहे; परंतु त्यांच्या नावावर शेती असे शेतकरी, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी, आयकरदाता, पती-पत्नी दोघांची नोंदणी, बँकेतील एफडी, मयत लाभार्थी अशांना अपात्र ठरविण्यात आले असून, नोटीस बजावल्यानंतर अपात्र शेतकऱ्यांनी पैसे परत न केल्यास उताऱ्यावर बोजा चढविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. लाभ घेतलेल्या बहुतांश लाभार्थींना नोटीस देऊन अन्याय केला आहे. सुराणे येथील भाऊसाहेब शिवाजी अहिरे यांच्याकडे १ हेक्टर ९६ गुंठे जमीन आहे. त्यांच्या घरात कोणीही नोकरीला नाही किंवा ते आयकरदाता नाहीत, ना कोणत्या बँकेत एफडी केली आहे. असे असताना त्यांना अपात्र ठरवून त्यांच्याकडून १० हजार रुपयांची वसुली केली आहे. ते पात्र असताना कोणतीही चौकशी न करता तलाठ्याकडून त्यांना बोजा चढविण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
संबंधित विभागाने पीएम किसान सन्मान निधी वसुलीच्या नोटीस दिल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांनी घाबरून न जाता चौकशी करून तांत्रिक बाबींची पूर्तता करावी, जेणेकरून लाभ घेता येईल. संबंधित अधिकाऱ्यांनी देखील त्यासाठी सहकार्य करावे.
- दिलीप बोरसे, अमदार

पीएम किसान सन्मान निधीच्या अपात्रतेबाबत संबंधित विभागानेच महसूल यंत्रणेला याद्या सादर केल्या आहेत. त्यानुसार कारवाई केली जात आहे. ज्या कोणी शेतकऱ्यांवर अन्यायकारक कारवाई होत असले अशा शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
- जितेंद्र इंगळे पाटील, तहसीलदार, बागलाण
अपात्र लाभार्थी २०३ झ्र वसुलीची रक्कम १६ लाख ६८ हजार
आयकरदाता ८३४ झ्र वसुलीची रक्कम ८३ लाख ८६ हजार

 

 

Web Title: Notice to one thousand bogus beneficiaries in Baglan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.