शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

पाणी साचल्यास पालिका नागरिकांना धाडणार नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:48 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात विविध उपाययोजना केल्यानंतरही डासांचे प्रमाण वाढत असून, जून महिन्यानंतर जुलै महिन्यातही सोळाहून अधिक रुग्ण आढळल्याने आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली व कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. अस्वच्छता करणाºया गोठेधारकांना नोटिसा बजावण्याबरोबरच अस्वच्छता करणारे नागरिक तसेच तळघरात व अन्य ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढण्यास पूरक अस्वच्छता ठेवणाºयांना नोटिसा देऊन कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात विविध उपाययोजना केल्यानंतरही डासांचे प्रमाण वाढत असून, जून महिन्यानंतर जुलै महिन्यातही सोळाहून अधिक रुग्ण आढळल्याने आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली व कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. अस्वच्छता करणाºया गोठेधारकांना नोटिसा बजावण्याबरोबरच अस्वच्छता करणारे नागरिक तसेच तळघरात व अन्य ठिकाणी डासांची उत्पत्ती वाढण्यास पूरक अस्वच्छता ठेवणाºयांना नोटिसा देऊन कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली डास निर्मूलन समितीची सभा आयुक्तांच्या दालनात संपन्न झाली. यावेळी झालेल्या बैठकीस आरोग्य, घनकचरा, बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण मंडळ, विभागीय हिवताप अधिकारी (राज्य) व नगररचना विभागातील विभागप्रमुख तसेच सहाही विभागांचे विभागीय अधिकारी हजर होते.  डास व डासांपासून होणारे विविध आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांमार्फत डास प्रतिबंधात्मक अळीनाशक फवारणी व धूर फवारणी, पाणीसाठे तपासणे, किरकोळ अभियांत्रिकी कामे, आरोग्य  शिक्षण, जीवशास्त्रीय उपाययोजना, ताप रुग्ण सर्वेक्षण, रक्तजल नमुने घेणे, नोटीस देण्यासह विविध प्रकारची कामे करण्यात येत असल्याचा संबंधित विभागप्रमुखांचा दावा असला तरी पण डेंग्यू रुग्ण संख्येत वाढ होत आहे.  जानेवारी ते जून या कालावधीत डेंग्यूचे ११७ रुग्ण आढळले आहेत. त्यातही मनपाच्या सातपूर, सिडको व नाशिकरोड विभागात डेंग्यूचे जास्त रु ग्ण आढळले असून, जून महिन्यात प्रभाग २६, प्रभाग ३१, प्रभाग २ मध्ये अधिक रु ग्ण आढळले आहेत. मनपा कार्यक्षेत्रातील सातपूर-अंबड लिंकरोड परिसर, जेलरोड परिसर, इंदिरानगर परिसर व पाथर्डी फाटा परिसरात जास्त रु ग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.गेल्या सहा महिन्यांत शहरात हिवतापाचा एकच रु ग्ण आढळला असून, पंधरा रुग्ण चिकुनगुण्याचे आढळले आहेत. त्या तुलनेत डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. तसेच डास नियंत्रणाच्या दृष्टीने गोठेधारकांवर कारवाई करणे, घरात व घरपरिसरात डास उत्पत्ती आढळल्यास नागरिकांना नोटिसा बजावाव्यात. नवीन बांधकामामध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता घेणे, पाणी साठत असलेल्या तळघरांमध्ये कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.मनपा मिळकतींची दक्षता, पोलिसांना कळविणारमहापालिकेच्या वतीने डेंग्यू डासांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आयुक्तांनी विविध उपाय करण्यास सांगितले असून, जनप्रबोधन करतानाच महापालिका मिळकतींच्या छतावर पाणी साचू न देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. शिवाय नळाचे खड्डे बंद करण्यात येणार असून, अस्वच्छ पोलीस वसाहतीबाबतीत पोलीस आयुक्तांना कळवण्यास सांगितले आहे. जास्त डेंग्यू रुग्ण आढळलेले शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना पत्र देण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.आरोग्य समितीतही जोरदार चर्चामहापालिकेच्या आरोग्य सहाय्य समितीची बैठक बुधवारी (दि.११) घेण्यात आली. सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील रोगराईवर जोरदार चर्चा झाली. यावेळी छतावर व तळघरांमध्ये पाणी साचले असल्यास त्या मिळकतधारकांना दंडात्मक कारवाईच्या नोटिसा देण्याचे ठरविण्यात आले. तसेच मोकळ्या जागेत अस्वच्छता असल्यास त्यांनाही नोटिसा बजावण्याचे ठरविण्यात आले.शहरात वाढली रोगराईशहरात गेल्या आठवडाभरात महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये तसेच शहरी आरोग्य केंद्रात येणाºया रुग्णांची संख्या वाढली असून, वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार डेंग्यूचे १६ रुग्ण, तापाचे ४७३, विषमज्वरचे १० आणि काविळीचे तीन रुग्ण आढळले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका