शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी न करणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 01:05 IST

नवीन नियमावलीनुसार शहरातील रुग्णालयांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता देण्यात आलेली ३१ मार्चची मुदत संपल्यानंतर ५७६ पैकी ३२५ रुग्णालयांनी नोंदणी अथवा नूतनीकरणासाठी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आता संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू केली असून, १५ एप्रिलच्या आत अनधिकृत रुग्णालये बंद न झाल्यास महापालिकेमार्फत कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाशिक : नवीन नियमावलीनुसार शहरातील रुग्णालयांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता देण्यात आलेली ३१ मार्चची मुदत संपल्यानंतर ५७६ पैकी ३२५ रुग्णालयांनी नोंदणी अथवा नूतनीकरणासाठी काहीच प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आता संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू केली असून, १५ एप्रिलच्या आत अनधिकृत रुग्णालये बंद न झाल्यास महापालिकेमार्फत कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, महापालिकेच्या इशाºयानंतर २४१ रुग्णालयांची नोंदणी-नूतनीकरण केल्याची माहिती आहे.  शहरातील रुग्णालयांच्यासुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य सरकारने नव्याने नियमावली आणली आहे. त्यात प्रामुख्याने नगररचनासह अग्निशमन विभाग, पर्यावरण तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहेत. रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा बसविणे, इमारतींचा मिश्र वापर असल्यास दोन जिन्यांची व्यवस्था करणे, खाटांनुसार वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे आदी नियमांचा त्यात समावेश आहे. मात्र, या नियमांमधून जुन्या रुग्णालयांना वगळण्यात यावे अथवा त्यांना सवलत देण्यात यावी, वाहनतळाचे नियम शिथिल करावेत तसेच बांधकामे नियमित करण्यासाठी हार्डशिप प्रीमिअम केवळ नवीन रुग्णालयांसाठी लागू करावा आदी मागण्या आयएमएने महापालिकेकडे मांडल्या होत्या. परंतु, आयुक्तांनी नियमानुसारच कार्यवाही होईल, अन्यथा १ एप्रिलपासून नोंदणी न करणाºया रुग्णालयांवर सील ठोकण्याची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला होता. ३१ मार्च २०१८ पर्यंत शहरातील ५७६ रुग्णालयांपैकी २४१ रुग्णालयांनीच नोंदणी व नूतनीकरणाला प्रतिसाद दिला असून, १० रुग्णालयांचे नूतनीकरणासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. ७० नवीन रुग्णालयांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत.१५ दिवसांची मुदतमहापालिकेने संबंधित रुग्णालयांना ३१ मार्च २०१८ ची मुदत दिलेली होती. परंतु, मुदत देऊनही सुमारे ३२५ रुग्णालयांनी नोंदणीच केलेली नाही. त्यामुळे आता सदर रुग्णालये बंद का करू नये, अशा नोटिसा पाठविण्यात येत आहे. १५ दिवसांत संबंधितांनी स्वत:हून अनधिकृत रुग्णालय बंद न केल्यास महापालिकेमार्फत बंद करण्याची आणि फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल