शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कंपाउंडिंग स्कीममध्ये प्रस्ताव दाखल करूनही नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:20 IST

महापालिकेच्या कंपाउंडिंग स्कीम अंतर्गत वाढीव बांधकामे नियमित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याची चौकशी करण्याच्या आतच नगररचना विभागाने नाशिकरोड येथील एका विकासकाला नोटीस बजावली असल्याने संबंधित बुचकळ्यात पडला आहे.

नाशिक : महापालिकेच्या कंपाउंडिंग स्कीम अंतर्गत वाढीव बांधकामे नियमित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याची चौकशी करण्याच्या आतच नगररचना विभागाने नाशिकरोड येथील एका विकासकाला नोटीस बजावली असल्याने संबंधित बुचकळ्यात पडला आहे. कंपाउंडिंग स्कीममध्ये प्रस्ताव दाखल असल्याबाबत पोचच नसल्याने नोटिसीला काय उत्तर द्यावे, असा प्रश्न संबंधिताला पडला आहे.राज्य शासनाच्या वतीने बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी नियमावली करण्यात आली असून, त्याअंतर्गत नाशिकमधील बेकायदेशीर बांधकामे नियमितीकरणासाठी कंपाउंडिंग स्कीम करण्यात आली होती. त्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत होती. या मुदतीत २९२३ प्रस्ताव दाखल झाले आहेत. तथापि, असे प्रस्ताव दाखल करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची पोच देण्यात आलेली नाही. दाखल प्रस्तावांची सूची महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार असून हीच पोचपावती समजावी, असे सांगण्यात आले होते. परंतु अद्याप संकेतस्थळांवर ही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे अशाप्रकारचा पुरावा हाती नसतानाच महापालिकेने नोटीस बजावली तर काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. ‘लोकमत’नेदेखील तो मांडला होता. वास्तुविशारद आणि विकासकांची भूमिका रास्त ठरली असून, महापालिकेने नाशिकरोड येथील एका विकासकाला बेकायदेशीर बांधकाम हटविण्यासाठी नोटीस बजावली आहे. सदरचे बांधकाम हटवून घ्यावे अन्यथा महापालिका ते निष्कासित करून त्याचा खर्च वसूल करण्यात येईल, असे नोटिसीत म्हटले आहे. संबंधित विकासकाने महापालिकेच्या कंपाउंडिंग स्कीममध्ये सहभाग दर्शविला आहे, परंतु पोच नसल्याने नोटिसीला उत्तर देणे काहीसे कठीण जाणार आहे. शिवाय महापालिकेच्या विविध विभागात समन्वय नसल्याचेदेखील स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका