शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

७ हजार मिळकतधारकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:55 IST

जागेचा बिनशेतीसाठी वापर करणाऱ्या शहरातील सुमारे सात हजार मिळकतधारकांना महसूल विभागाने कर वसुलीसाठी नोटिसा बजावल्या असून, त्यात नाशिक महापालिका, एस.टी. महामंडळ, औष्णिक विद्युत केंद्रासह शासकीय व निमशासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. सुमारे आठ कोटी रुपयांपेक्षा अधिक बिनशेती कराच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल विभागाने या नोटिसा बजावल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहे.

नाशिक : जागेचा बिनशेतीसाठी वापर करणाऱ्या शहरातील सुमारे सात हजार मिळकतधारकांना महसूल विभागाने कर वसुलीसाठी नोटिसा बजावल्या असून, त्यात नाशिक महापालिका, एस.टी. महामंडळ, औष्णिक विद्युत केंद्रासह शासकीय व निमशासकीय कार्या लयांचाही समावेश आहे. सुमारे आठ कोटी रुपयांपेक्षा अधिक बिनशेती कराच्या वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल विभागाने या नोटिसा बजावल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहे.  शेतजमिनीचा बिनशेतीसाठी वापर करणाºया मिळकतधारकांकडून दरवर्षी मार्च महिन्यात बिनशेती कराची वसुली केली जाते. यातील काही मिळकतधारकांनी रहिवासासाठी बिनशेती करताना अनुमती घेतली, परंतु कालांतराने रहिवासाच्या नावाखाली वाणिज्य वापर सुरू केला आहे. विशेष नाशिक शहरातील बहुतांशी प्रमुख रस्ते, चौकात अशा प्रकारच्या वाणिज्य वापराच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. नियमानुसार या मिळकतधारकांनी जमिनीच्या वापरात बदल केल्याबाबत रीतसर महसूल विभागाची अनुमती घेणे व त्यापोटी शुल्क भरणे आवश्यक आहे, परंतु तसे झालेले नसल्याने नाशिक तहसीलदार कार्यालयाने यंदाही बिनशेतीकर थकविणारे शहरातील मालमत्ताधारक शोधून काढले आहेत. त्यात प्रामुख्याने मोठ्या इमारती, अपार्टमेंट, कॉलनीतील रहिवाशांचा समावेश आहे. शासनाचा बिनशेती कर दरवर्षी भरावा लागतो याचा गंध नसणारेही अनेक मिळकतधारक या निमित्ताने समोर आले आहेत. वाणिज्य वापर करणाºयांमध्ये गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड, जुना आग्रारोड, शालिमार, नाशिक-पुणेरोड, पंचवटी या भागात सर्वाधिक संख्या असल्याने अशा प्रत्येकाला नोटीस बजावण्यात आली आहे. बिनशेतीकराचा भरणा न केल्यास मालमत्ता जप्त करण्याचा व मालमत्तेवर बोझा चढविण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.  बिनशेतीकराच्या वसुलीसाठी नाशिक महापालिका, दूरसंचार कार्यालय, एस.टी. महामंडळ, एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र यांसारख्या शासकीय व निमशासकीय कार्याल यांचाही समावेश असून, एकट्या नाशिक महापालिकेकडून दरवर्षी ७० लाखांपर्यंतचा बिनशेती कर वसूल केला जातो. यात प्रामुख्याने महापालिकेची कार्यालये, गाळे, भाजीपाला मार्केट या मिळकतींचा समावेश आहे. नाशिक तहसीलदार कार्यालयाने या सर्वांना नोटिसा भरल्या असून, पैसे भरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. नाशिक तहसील कार्यालयाला बिनशेतीकरापोटी ८ कोटी ६० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याने त्याच्या वसुलीसाठी तलाठी, मंडळ अधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. त्यासाठी थकबाकीदारांचे टप्पे करण्यात आले आहेत. पाच हजारांच्या आतील व पाच हजारांच्या पुढील मिळकतधारकांची यादी तयार करण्यात आली आहे.एस.टी. महामंडळाकडे दोन कोटींची थकबाकीराज्य परिवहन महामंडळाने ठक्कर बाजार नवीन बसस्थानक बांधताना त्याचा अकृषिक परवाना घेतला नाही तसेच बसस्थानकाची उभारणी बीओटी तत्त्वावर करून त्याठिकाणी शेकडो व्यावसायिक गाळे उभारण्यात आले आहेत. एस.टी. महामंडळाची ही कृती जमीन महसूल अधिनियमाचे उल्लंघन करणारी असल्यामुळे महसूल खात्याने एस.टी. महामंडळाकडे वेळोवेळी बिनशेती कराची मागणी केली. सुमारे अडीच कोटी रुपयांची थकबाकी महामंडळाकडे थकीत असून, त्याच्या वसुलीसाठी महसूल खात्याने काही वर्षांपूर्वी दोन एस.टी. बसेस जप्त करण्याची कार्यवाही केली होती, तसेच महामंडळाचे बॅँक खातेही गोठविले होते. परंतु वरिष्ठ शासकीय पातळीवरून हस्तक्षेप करण्यात आल्याने ही कार्यवाही पुन्हा स्थगित करण्यात आली. यंदा पुन्हा महसूल खात्याने एस.टी. महामंडळाकडे तगादा लावला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका