शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ४२ हजार  मिळकतधारकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:35 IST

नाशिक : यापूर्वी बांधकाम करूनही घरपट्टी लागू न झालेल्या शहरातील ६२ हजार पैकी ४२ हजार मिळकतींना महापालिकेने सहा वर्षे ...

नाशिक : यापूर्वी बांधकाम करूनही घरपट्टी लागू न झालेल्या शहरातील ६२ हजार पैकी ४२ हजार मिळकतींना महापालिकेने सहा वर्षे मागे जाऊन नवीन भाडेमूल्यानुसार करआकारणीच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे शहरात भडका उडाला असून, राजकीय पक्ष विरोधासाठी सरसावले आहे. यासंदर्भात, शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी आणि भाजपा आमदार सीमा हिरे यांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिले असून, करवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. येत्या दि. १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या महासभेत यासंदर्भात भाजपा आणि सेनेने लक्षवेधी देण्याची तयारी सुरू केली असून, त्यामुळे हा विषय गाजण्याची शक्यता आहे.महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दि. १ एप्रिलपासून वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली आहे ही वाढ त्यांनी नव्या मिळकतींना लागू राहील, असे स्पष्ट केले होते. तथापि, घरपट्टी लागू न झालेल्या ज्या ६२ हजार मिळकती महापालिकेला आढळल्या त्यांना ही करवाढ लागू करण्यात आली असून, आता नोटिसा बजावतांना त्यांना पूर्वलक्षी पद्धतीने थकबाकी आणि दंडात्मक रक्कम आकारणीच्या नोटिसा बजावण्यास प्रारंभ झाला आहे. महापालिकेच्या घरपट्टी विभागाने आत्तापर्यंत ६२ पैकी ४२ हजार मिळकतींना नोटिसा बजावल्या आहेत.मनपा आयुक्तांच्या  भूमिकेकडे लक्षमहापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना वार्षिक भाडे मुल्य आकारणीच्या माध्यमातून करवाढ करण्यास कडाडून विरोध केला होता. सरसकट सर्व करवाढ रद्द करावी, अशी मागणी होत होती. त्यासाठी सर्वपक्ष एकत्र आले होते आणि मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर मुंढे यांनी सरासरी ५० टक्के दर कमी केले असले तरी संपूर्ण करवाढ रद्द न झाल्याने आता महासभेच्या निमित्ताने भाजपासह सर्वच पक्षांना संधी चालून आली असून, आयुक्त राधाकृष्ण गमे याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त