शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीचा फटका सर्वसामान्यांनाच बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 02:23 IST

देशातील काळा पैसा बाहेर येईल, असे सांगत केंद्र शासनाच्या नोटबंदीचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसला. यामधून मात्र कोणत्याही प्रकारचा काळा पैसा बाहेर निघाला नसल्याने नोटबंदी पूर्णत: फसवी आणि त्रासदायक ठरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शहरातील शनि पटांगणावर शुक्रवारी सायंकाळी उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ मोर्चाला सुरुवात झाली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नबाब मलिक आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित होते.

येवला : देशातील काळा पैसा बाहेर येईल, असे सांगत केंद्र शासनाच्या नोटबंदीचा फटका केवळ सर्वसामान्यांना बसला. यामधून मात्र कोणत्याही प्रकारचा काळा पैसा बाहेर निघाला नसल्याने नोटबंदी पूर्णत: फसवी आणि त्रासदायक ठरली असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शहरातील शनि पटांगणावर शुक्रवारी सायंकाळी उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ मोर्चाला सुरुवात झाली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नबाब मलिक आदी राज्यस्तरीय नेते उपस्थित होते.  येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फसव्या सरकारचा सार्वत्रिक निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खासदार सुळे यांनी सरकारवर विविध धोरणे आणि मुद्द्यांवरून घणाघाती हल्ला चढवला. येवल्यातील शनि पटांगण संपूर्ण भरले होते. खासदार सुळे म्हणाल्या, हे सरकार शेतकरी, कष्टकरी आणि जनतेला दु:खाच्या खाईत लोटण्यासह राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्यावर सूड उगवत आहे. भुजबळ यांच्यावर २२ महिने अन्याय करणाºया सरकारला नियती व जनता कधीच माफ करणार नाही, असे त्या म्हणाल्या.‘महाराष्ट्रात कॉपी जमणार नाही’डिजिटल इंडियामागे धावणे बंद करा, असे आवाहन करून सुप्रिया सुळे म्हणाल्या, गुजरातमध्ये भाजपा कॉपी करून पास झाले. जनतेलाच अडचणीत आणणाºया भाजपा सरकारला महाराष्ट्रात जनता कॉपी करू देणार नाही, असेही त्या म्हणाल्या.च्महाराष्टÑाचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण आणि राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदर्श आणि शिकवण जमेल तेवढे करा, जमेल तेच जनतेला सांगा, यावर आम्ही वाटचाल करणार आहोत. उगीच फसवणूक करण्याचा आपला धर्म नाही. ही शिकवण घेऊन राष्ट्रवादी काम करीत आहे. भाजपासारखी जनतेची दिशाभूल करीत सत्ता मिळवण्याची आमची संस्कृती नाही. सर्वसामान्यांना अडचणीत आणणारे सरकार जनताच खाली खेचेल, असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस