शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

शाळा अनुदान नाहीच; शिक्षण अधिकार कायद्याचाही बडगा

By admin | Updated: May 20, 2014 00:17 IST

संस्थाचालक नाराज : शासन, महापालिकेकडे करावी लागते याचना

संस्थाचालक नाराज : शासन, महापालिकेकडे करावी लागते याचनानाशिक : शिक्षण अधिकारातील अटींमुळे झालेली कोंडी याबरोबरच महापालिकेकडून लादण्यात आलेली घरप˜ी आणि वीज कंपनीकडून व्यावसायिक दराने आकारण्यात येणार्‍या दरामुळे शिक्षणसंस्थाचालक मेटाकुटीला आले आहेत. शासनाने या बाबींचा फेरविचार करण्याबरोबरच रखडलेले शाळा अनुदान तातडीने अदा करावे, असा एकमुखी ठराव संस्थाचालकांच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्षस्थानी सूर्यकांत रहाळकर होते. नाशिक शहर खासगी मान्यताप्राप्त शाळा संस्थाचालकांची बैठक येथील पेठे विद्यालयात घेण्यात आली. या बैठकीत संस्थाचालकांनी शिक्षणाच्या अधिकारातील दहा कलमांना आक्षेप घेत त्यात सुधारणा करण्याची विनंती केली आहे. त्याबरोबरच स्थानिक पातळीवर महापालिका आणि वीज कंपनीकडून आकारण्यात येणार्‍या घरप˜ी आणि वीजदराबाबतही नाराजी व्यक्त करीत शाळांची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. खासगी मान्यताप्राप्त शाळांना गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून शासनाकडून शाळा अनुदान देण्यात आलेले आहे. शाळा अनुदानाची मोठी रक्कम पडून आहे. मात्र ती अदा केली जात नसल्याने शाळांना अनेक कामे करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी संस्थाचालकांनी केल्या. शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार प्रत्येक शाळेला स्वतंत्र मैदान असावे असा नियम आहे. वास्तविक इंग्रजी शाळा असा नियम धाब्यावर बसवितात, त्यांना मात्र अभय मिळते आणि खासगी मान्यताप्राप्त शाळांना सक्ती केली जाते. त्यापेक्षा ज्या शाळांना मैदान नाही त्यांना नजीकची एखादी शाळा किंवा मनपाच्या जागेचा वापर करण्यास मुभा देण्यात यावी, मुख्याध्यापकांना वर्ग देण्याची अट रद्द करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. शाळांना पुरविण्यात येणार्‍या भौतिक सुविधांवर मोठा खर्च होतो; परंतु शासनाकडून अनुदानच प्राप्त होत नसल्याने अनेक अडचणी येतात ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा ठराव करण्यात आला. त्याचप्रमाणे शाळेतील भरतीप्रकियेला उपसंचालक कार्यालयाची परवानगी लागते; परंतु त्यासाठी बराच वेळ खर्ची होतो. लवकर परवानगी दिली जात नसल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो, अशीही तक्रार संस्थाचालकांनी मांडली.या बैठकीस रवींद्र विद्यालयाचे मनोज पिंगळे, कालिका एज्युकेशन सोसायटीचे केशवअण्णा पाटील, उन्नती एज्युकेशन सोसायटीचे अशोक सोनजे, तरुण ऐक्य मंडळाचे बी. के. मुखेडकर, गणेश धात्रक संस्थेचे दत्तात्रय धात्रक, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अरुण पैठणकर, मॉर्डन एज्युकेशनचे किसन विधाते, नाशिक हिंदी सभेचे सुरेश गुप्ता, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संजय सोनजे, वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे ॲड. पी. आर. गिते, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेचे बाळासाहेब ढोकळे, मॉर्डन एज्युकेशन सोसायटीचे डॉ. जे. एस. खोडे, नगरसेवक सुदाम कोंबडे उपस्थित होते. --इन्फो--असे झाले ठराव... * महापालिकेने शहरातील शैक्षणिक संस्थांच्या इमारतीची घरप˜ी केवळ ५० टक्केच आकारावी, असा ठराव केलेला आहे. तथापि, या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याने संस्थाचालकांना शंभर टक्के घरप˜ी भरावी लागत आहे. मराठी अनुदानित शाळांची घरप˜ी व पाणीप˜ीच रद्द करण्यात यावी. शिक्षण संस्थाचालकांना व्यावसायिक दराने वीजबिल दिले जाते. हे बिल घरगुती ग्राहकाप्रमाणे आकारण्यात यावे. शासनाच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यातील १० निकषांबाबत फेरनिर्णय घेण्यात यावा. फोटो क्रमांक १९पीएचएम८३