शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

केवळ उद्योजकांना नको, कामगारांना द्या पॅकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 00:48 IST

आर्थिक मंदीबाबत सरकार उद्योगांना पॅकेज देऊन धोरणात काही बदल करीत आहे. त्यात कामगारांचाही विचार झाला पाहिजे, मंदीमुळे बाधीत कामगारांना किमान वेतनानुसार दरमहा वेतन मिळावे यासह अन्य ठराव करून या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय राज्यस्तरीय कामगार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक : आर्थिक मंदीबाबत सरकार उद्योगांना पॅकेज देऊन धोरणात काही बदल करीत आहे. त्यात कामगारांचाही विचार झाला पाहिजे, मंदीमुळे बाधीत कामगारांना किमान वेतनानुसार दरमहा वेतन मिळावे यासह अन्य ठराव करून या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय राज्यस्तरीय कामगार संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.औद्योगिक क्षेत्रात आर्थिक मंदीमुळे कामगारांवर मोठे संकट ओढवले आहे. अनेक उद्योगांमध्ये काम बंद, लेआॅफ कामगार कपात, विशेषत कंत्राटी कामगार व शिकाऊ कामगार यांना हजारोंच्या संख्येने कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही. लघुउद्योगही मोठ्या अडचणीत आहेत. यावर विचार मंथन करण्यासाठी खुटवडनगर येथील सिटू कामगार भवन येथे राज्यातील खासगी उद्योगातील विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आपल्या जिल्ह्यामध्ये मंदीमुळे उद्योगावर आणि कामगारांवर नेमका काय परिणाम झाला आहे याची माहिती कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी सादर केली. केंद्र सरकारने कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार हक्कांवर केलेल्या हल्ल्यामुळे बेरोजगारी कशा पद्धतीने वाढली यावर सखोल चर्चा करण्यात आली.या चर्चेत मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यासह आॅटोमोबाइल आणि सहायक क्षेत्रातील कामगार संघटनांचे प्रतिनिधी व आर्थिक मंदीमुळे बाधीत अन्य क्षेत्रातील कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला. राज्यातील कामगारांच्या वतीने काही ठराव करण्यात आलेत. हे ठराव अंमलबजावणीसाठी राज्य व केंद्र सरकारकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या विरोधात १६ ते २० सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकारी आणि कामगार विभागांच्या कार्यालयासमोर राज्यव्यापी जनआंदोलन छेडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीस सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, किशोर ढोकळे, प्रवीण मोहिते, कॉ. उद्धव भावलकर, कॉ. राजू देसले, बाळासाहेब वाघ, कॉ. वसंत पवार, उत्तम खांडबहाले, कॉ. सईद अहमद, कॉ. विवेक मोंटेरो, बॉश युनियनचे अध्यक्ष प्रवीण पाटील, अशोक घुगे, रूपेश वरपे, प्रवीण मोहिते, तुकाराम साळवी, संजय कसुर्डे, शशिकांत मांद्रे, दामोदर मानकापे, सीताराम ठोंबरे, भिवाजी भावले, कैलास धात्रक, श्रावण केदारे, योगेश अहिरे, विवेक कासार आदींनी आपले विचार मांडले.बैठकीतील प्रमुख ठरावकामगार कायद्यांमधील कामगार विरोधी प्रस्तावित बदल रद्द करावेत.मंदीच्या संकटावर सरकारने पर्यायी धोरणे अवलंबली पाहिजेत, ज्यामुळे देशी उद्योगांना मदत होईल आणि अधिकाधिक रोजगार निर्माण होतील.मुख्यत्वे किमान वेतन दरमहा १८ हजारांपर्यंत वाढवून, शेतकºयांच्या शेतीमालाला योग्य दर निश्चित करणे व अंमलबजावणी करून ६५०० रुपये दरमहा किमान पेन्शनची हमी देऊन जनतेची खरेदी शक्ती वाढविण्याच्या उपाययोजना करून मागणीचे संकट दूर केले पाहिजे.मंदीमुळे कामगार बेरोजगार झाले आहेत, यामध्ये कंत्राटी कामगार, एनईईएम आणि फिक्स टर्म कर्मचाºयांचा समावेश आहे. राज्य सरकारकडून त्यांना पुन्हा नोकरीत काम मिळेपर्यंत किमान वेतनाच्या दरानुसार वेतन दिले पाहिजे.मंदीचे परिणाम आणि प्रतिसाद म्हणून घ्यावयाच्या उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीसमवेत आपत्कालीन बैठक बोलवा.

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकार