शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’ नव्हे, दिवाळं काढलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:11 IST

चार वर्षांपासून ‘वर्दी’ नाही, किमान वेतन नाही, राज्य कर्मचाºयाचा दर्जा नाही, वाहनांच्या दुरवस्थेमुळे सुरक्षा वाºयावर, बोनस नाही, महागाई भत्ता नाही... सांगा, आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? ‘अच्छे दिन’ दाखविणाºयांनी आमचं दिवाळं काढलं, अशा उद्विग्न आणि संतापजनक भावना एसटी चालक-वाहकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

नाशिक : चार वर्षांपासून ‘वर्दी’ नाही, किमान वेतन नाही, राज्य कर्मचाºयाचा दर्जा नाही, वाहनांच्या दुरवस्थेमुळे सुरक्षा वाºयावर, बोनस नाही, महागाई भत्ता नाही... सांगा, आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? ‘अच्छे दिन’  दाखविणाºयांनी आमचं दिवाळं काढलं, अशा उद्विग्न आणि संतापजनक भावना एसटी चालक-वाहकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.  एसटी चालक-वाहक दररोज रस्त्यावर जीवन-मरणाचा खेळ खेळत एसटीला उत्पन्न मिळवून देत असले तरी या सरकारला त्यांच्या आर्थिक सुबत्तेविषयी कुठलेही सोयरसुतक नसल्याचे मत कर्मचाºयांनी व्यक्त केले. किमान वेतन कायद्यानुसार चालक-वाहकांना वेतनही दिले जात नाही. यामुळे चालक-वाहक कर्जबाजारी झाले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा मोठा प्रश्न एसटी चालविणाºयांपुढे निर्माण झाला आहे. मात्र परिवहन प्रशासन व सरकार याबाबत अनभिज्ञ असल्याचे भासवत ‘कानावर हात’ ठेवून आहेत, यामुळे चालक-वाहकांवर राज्यव्यापी संप पुकारण्याची वेळ आली व या परिस्थितीला सरकार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया चालक-वाहकांनी बोलून दाखविली.आठ ते नऊ हजार रुपये दरमहा पगारात महामंडळाच्या अधिकाºयांनी कुटुंब चालवून दाखवावे. तुटपुंज्या वेतनामुळे चालक-वाहक कर्जबाजारी झाले. संपामुळे दिवाळीत प्रवाशांचे हाल झाले हे मान्य आहे; मात्र अच्छे दिन दाखविणाºयांना त्याची जाणीव नाही आणि आमच्या वेदनांची व सातत्याने होणारे हालही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे करणार काय? संप होऊ न देण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे होते. - पांडुरंग बडदे, चालक३१ वर्षे महामंडळात वाहक म्हणून सेवा करीत आहे; मात्र कुटुंबासाठी काही कमविता आले नाही. तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न आजही तितकाच गंभीर वाटतो. लोकांचे झालेले हाल मान्य आहे; मात्र त्यांच्या त्रासापेक्षा आमचे हाल कितीतरी पटीने अधिक आहेत. संप योग्य आहे. - जालिंदर दहिफळे, वाहकसरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे संपाची वेळ आली. सरकारने चालक-वाहकांसह राज्यातील जनतेला वेठीस धरले. सरकारची भूमिका या संपाला कारणीभूत ठरली. भाडेवाढ केली मात्र त्या भाडेवाढीनंतर चालक-वाहकांना काय मिळाले? सरकारने चालक-वाहकांचा विचार करावा.  - पांडुरंग पवार, चालक