शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्षम नव्हे, आदर्श आमदार, खासदार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:28 IST

नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या कै. माधवराव लिमये कार्यक्षम आमदार पुरस्काराच्या कक्षेत विस्तार करण्यात येणार आहे. आता हा पुरस्कार भारतातील कोणत्याही राज्यातील आदर्श आमदारास किंवा आदर्श खासदारास देऊन त्याचे स्वरूप राष्टÑीय करण्यात येत असल्याची माहिती सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर आणि लिमयेंच्या कन्या डॉ. शोभाताई नेर्लीकर आणि डॉ. विनायक नेर्लीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक : नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या कै. माधवराव लिमये कार्यक्षम आमदार पुरस्काराच्या कक्षेत विस्तार करण्यात येणार आहे. आता हा पुरस्कार भारतातील कोणत्याही राज्यातील आदर्श आमदारास किंवा आदर्श खासदारास देऊन त्याचे स्वरूप राष्टÑीय करण्यात येत असल्याची माहिती सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर आणि लिमयेंच्या कन्या डॉ. शोभाताई नेर्लीकर आणि डॉ. विनायक नेर्लीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावानावर त्याचा बोजा पडू नये, या उद्देशाने नेर्लीकर दाम्पत्याने या पुरस्कारासाठी अजून ११ लाख रुपयांची देणगी यावेळी जाहीर केली.नाशिकचे ज्येष्ठ समाजवादी नेते, पत्रकार, लेखक आणि माजी आमदार कै. माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सावानातर्फे महाराष्टÑातील सर्वोत्तम आमदारास कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला जात होता. आता त्याऐवजी महाराष्टÑासह देशभरातील कोणत्याही विधानसभेतील सर्वोत्तम आमदार किंवा लोकसभा, राज्यसभेतील आदर्श खासदारास यंदापासून देण्यात येणार असल्याचे डॉ. नेर्लीकर यांनी सांगितले. या पुरस्काराच्या निवडीसाठी नऊ सदस्यांची स्वतंत्र समिती नेमण्यात येणार आहे. त्यात अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि सचिव हे सावानाचे तीन कायमस्वरूपी सदस्य तसेच नेर्लीकर कुटुंबाचे दोन सदस्य, स्थानिक आमदार किंवा खासदार तसेच राष्टÑीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील पत्रकार यांचा समावेश राहणार आहे. ही समितीच अंतिम नावनिश्चिती करणार असल्याचेही नेर्लीकर यांनी नमूद केले. यावेळी आर्चिस नेर्लीकर, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, धर्माजी बोडके, सहायक सचिव अभिजित बगदे, उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, श्रीकांत बेणी, भानुदास शौचे, प्रा. शंकर बोºहाडे, देवदत्त जोशी, शंकर बर्वे, वेदश्री थिगळे, किशोर पाठक आदी पदाधिकारी उपस्थित होते.११ लाख रुपयांची देणगीडॉ. नेर्लीकर दाम्पत्याने २००२ सालीच १४ लाख रुपयांची देणगी सावाना संस्थेकडे सुपूर्द केल्यानंतर २००३ सालापासून कार्यक्षम आमदार पुरस्कारास प्रारंभ करण्यात आला होता. मात्र, आता या पुरस्काराला राष्टÑीय स्वरूप देण्याच्या उद्देशाने डॉ. नेर्लीकर यांनी त्या रकमेत अजून ११ लाख रुपयांची भर घालत एकूण मिळून २५ लाख रुपयांचा निधी सावानाकडे सुपूर्द केला आहे. सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्याकडूनदेखील संस्थेला दोन लाख रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली. ही रक्कम लवकरच प्रदान केली जाणार असल्याची घोषणा जातेगावकर यांनी केली.लिमये सभागृहात देवघेव विभागनवीन देणगीच्या रकमेचा विनियोग पुरस्कार सोहळ्यासह लिमये सभागृहाच्या नूतनीकरणासाठी करण्यात येणार आहे. या दालनाचे नूतनीकरण झाल्यानंतर तिथेच पुस्तक देवघेव विभाग करण्यात येणार आहे. या दालनात जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचीही सोय व्हावी म्हणून तिथे जाण्यासाठी लिफ्टची सुविधा निर्माण केली जाणार आहे. तसेच नवीन रचनेत वाचकांना रॅकमधील कोणत्याही पुस्तकापर्यंत जाण्याची मुभा राहणार आहे.ई-वाचनालयाची सुविधानूतनीकृत दालनात ई वाचनालयाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून, त्यासाठी दालनात तीन संगणकांचीदेखील उपलब्धता करण्यात येणार आहे. तसेच बालविभागातही दोन संगणक ठेवून तिथेदेखील ई वाचनालयाची सुविधा बालदोस्तांना करून देण्यात येणार असल्याचे सहायक सचिव अ‍ॅड. अभिजित बगदे यांनी सांगितले.

टॅग्स :libraryवाचनालयNashikनाशिक