स्थळ : मनमाड वेळ : सकाळी ९ वाजतामनमाड रेल्वे जंक्शन परिसरातील ब्रिटिशकालीन मोठे रेल्वे पूल धोकादायक बनले असून या पुलांची दुरुस्ती व स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील ब्रिटिशकालीन पूल चर्चेत आले आहे. मनमाड येथील मालेगाव-शिर्डी या राज्यमार्गावर ब्रिटिशकालीन ओव्हरब्रिज आहे. हा पूल सर्वात जुना पूल म्हणून ओळखला जातो. मनमाड शहराचे रेल्वे लाइनमुळे दोन भाग पडतात. या दोन्ही भागातील नागरिकांना जा-ये करण्यासाठी एकमेव असलेल्या या ओव्हरब्रिजचा आधार घ्यावा लागतो. राज्यमार्गावरील या पुलावरून २४ तास महाकाय व अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या ब्रिटिशकालीन पुलाची मुदत संपल्याची चर्चा मनमाड शहर विकास आराखड्याच्या बैठकीत झाली होती. या पुलावरून पुणे, इंदूर, नगर आदि भागात जाणाऱ्या वाहनांची वर्दळ रात्रंदिवस सुरू असते, तर पुलाखालून उत्तर भारतात जाणाऱ्या व सर्व भागातून मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरू असते. या पुलावरील वर्दळ पाहता या पुलाच्या दुरुस्ती व देखभालीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या पुलाखालील बाजूकडून स्लॅबचे प्लॅस्टर उखडले असून स्लॅबमधील लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत. या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पूल नव्हे; ओव्हरब्रिजचा आधार
By admin | Updated: August 14, 2016 21:55 IST