शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या नमिता कोहोक ठरल्या ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 15:26 IST

कौतुकाची थाप: कामाची दखल घेत ५१ देशांमधून मिळाले नामांकन

ठळक मुद्देकौतुकाची थाप: कामाची दखल घेत ५१ देशांमधून मिळाले नामांकन

नाशिक-येथील डॉ. नमिता कोहोक यांना नुकत्याच अमेरिकेत झालेल्या ग्लोबल युनायटेड पिजंट स्पर्धेत ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन हे नामांकन मिळाले आहे. यानिमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेत नाशिकचे आणि देशाचे नाव उज्वल केले आहे. अमेरिकेतील मिनीसोटा, मिनेपॉलीस येथे ही स्पर्धा पार पडली. डॉ. कोहोक यावर्षी ५१ देशांमधुन नामांकन मिळवून लाइफटाइम क्वीन बनल्या आहेत.ग्लोबल युनायटेड पिजंट ही स्पर्धा एका आगळ्यावेगळ्या कारणासाठी जगप्रसिद्ध आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या जगभरातील सौंदर्यवती या स्वत: कॅन्सरवर मात केलेल्या असतात व कॅन्सर जनजागृतीचे काम करतात. मागील वर्षी त्यांची मिसेस ग्लोबल युनायटेड २०१७ म्हणून निवड झाली होती. त्यांच्या रुपाने भारतात पहिल्यांदाच हा सन्मान आला. ब्राझील, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, मलेशिया, अमेरिका अशा देशांमधुन त्यांची निवड झाली. मागील एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी कॅन्सरच्या जनजागृतीसाठी व कॅन्सरग्रस्त मुलांसाठी निधी जमा करतानाच गरजू मुलींच्या शिक्षणासाठी काम केले. वृद्धाश्रमात सकारात्मक जीवनावर काम करताना त्या स्वत: कॅन्सरवर मात करुन पुढे आल्या आहेत. या कामाची नोंद ५१ देशात होत होती. या किताबामुळे त्या आयुष्यभर या स्पर्धेच्या अविभाज्य घटक बनल्या आहेत. लाइफटाइम क्वीन हा किताब दिर्घकालीन कामानंतर मिळतो. पण तो डॉ. नमिता यांनी दुसºयाच वर्षी मिळवला असून त्यांच्या कामाची पावती म्हणून तो त्यांना ५१ देशांमधून मिळालेल्या पसंतीनुसार जाहिर करण्यात आलाआहे. हॅटट्रिकडॉ. नमिता कोहोक यांनी या स्पर्धेतील विजयाद्वारे हॅटट्रिक साधली आहे. २०१५ मध्ये हॉँगकॉँग येथे झालेल्या मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाइड आणि मिसेस इंडिया फोटोजेनिकच्या मानकरी ठरल्या. २०१७ मध्ये अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत त्या मिसेस ग्लोबल युनायटेड पदाच्या मानकरी ठरल्या. आता २०१८ मध्ये त्या लाइफटाइम क्वीन मिसेस ग्लोबल युनायटेडच्या मानकरी ठरल्या. तीनदा या स्पर्धेत त्यांनी आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवला आहे.

 हा किताब मला देण्यात येत असल्याचे स्पर्धेस्थळी अचानक जाहिर करण्यात आले. मला आधी त्याची काहीच कल्पना नव्हती. खरतर मी मागील वर्षीचा ‘मिसेस ग्लोबल युनायटेड’ किताब यंदाच्या विजेतीला सुपुर्द करण्यासाठी गेले होते. पण मी मागील वर्षी केलेल्या कामांची दखल घेत हा सन्मान मला बहाल करण्यात आला. आता दरवर्षी जुलै मध्ये होणाºया या स्पर्धेत मला सहभागी होता येणार आहे. त्याचे मला निमंत्रण असेल.याशिवाय या स्पर्धेसाठी भारताची संचालक म्हणून माझ्यावर नविन जबाबदारी आली आहे. मी आता भारतातुन स्पर्धक नेऊ शकणार आहे. आजपर्यंत ११ ते १२ जणींना लाइफटाइम क्वीनचा किताब मिळाला आहे.- डॉ. नमिता कोहोक, ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन

टॅग्स :NashikनाशिकAmericaअमेरिकाcancerकर्करोग