शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नाममात्र भाडेमिळकती  मनपाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:26 IST

महापालिकेच्या नाममात्र भाड्याने दिलेल्या मिळकती पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांच्या रडारवर असून, त्यांनी यासंदर्भात पश्चिम विभागातील एका मध्यवर्ती अभ्यासिकेला भेट देऊन पाहणी केली

नाशिक : महापालिकेच्या नाममात्र भाड्याने दिलेल्या मिळकती पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांच्या रडारवर असून, त्यांनी यासंदर्भात पश्चिम विभागातील एका मध्यवर्ती अभ्यासिकेला भेट देऊन पाहणी केली आणि विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्काची तसेच किती विद्यार्थी या ठिकाणी येतात, याची माहिती घेतल्याने या अभ्यासिकेवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.महापालिकेने कारवाई सुरू केल्यानंतर अनेक मिळकतधारकांनी महापालिकेने लागू केलेले रेडिरेकनरच्या अडीच पट भाडे जास्त असल्याची तक्रार केली असली तरी हे भाडे महापालिकेच्या महासभेनेच ठरविले असून, त्यासंदर्भात माजी आयुक्तडॉ. प्रवीण गेडाम यांनी, तर उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रदेखील दिले असून, त्यामुळे आता दरात बदल करण्याचा प्रश्नच नसल्याचे मत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केले.महापालिकेच्या मिळकतीसंदर्भात उच्च न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामुळे नाममात्र दराने भाडे आकारून दिलेल्या तसेच करार संपलेल्या मिळकती ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली आहे. मध्यंतरी काही मिळकती ताब्यात घेतल्यानंतर मार्चअखेरमुळे गती कमी झाली होती. परंतु नंतर पुन्हा प्रशासनाने या कामाला गती दिली आहे. कृषिनगर जॉगिंग ट्रॅकसमोरील बॅडमिंटन हॉल सिल केल्यानंतर अनेक क्रीडा संकुलांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. बॅॅडमिंटन हॉल सिल केल्याने खेळाडूंचे प्रशिक्षण थांबले असले तरी मुळातच महापालिकेला खेळ थांबविण्यात स्वारस्य नाही तर खेळ सुरूच ठेवावा, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित बॅडमिंटन हॉल चालविणाऱ्यांना पाचारण करून त्यांना एकावेळी वार्षिक भाडे भरणे शक्य नसेल, तर मग मासिक भाडे भरत जा असा सल्ला दिला आहे.दरम्यान, आयुक्तांनी गुरुवारी (दि. १८) पश्चिम विभागातील एका वाचनालय व अभ्यासिकेची माहिती घेतली. प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर आयुक्तांना या अभ्यासिकेत दोन हजार मुले येत असून, वार्षिक लाखो रुपये संस्थेला मिळत आहेत. मात्र प्रत्यक्षात महापालिकेला नाममात्र भाडे दिले जाते, असे निदर्शनास आल्याने प्रशासनाने सर्व माहिती संकलित करणे सुरू केले असून, लवकरच कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.आयुक्तांपुढे प्रश्नमहापालिकेच्या महासभेत एखादा निर्णय घेतल्यानंतर आणि तो पुन्हा उच्च न्यायालयात मंजूर झाल्यानंतर त्यात बदल करणे शक्य नसते. त्याच काही संस्थांनी रेडिरेकनरच्या अडीच पट भाडे भरल्यानंतर इतरांना त्यात सवलत कशी देता येईल, असा आयुक्तांचा प्रश्न आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त