शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कोणतीही लाट नाही : संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:45 IST

देशातील जनतेत २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही. कोणतीही लाट परत परत कधी येत नाही आणि अशा लाटेवर पुन्हा निवडणूक लढविलीही जात नाही.

नाशिक : देशातील जनतेत २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही. कोणतीही लाट परत परत कधी येत नाही आणि अशा लाटेवर पुन्हा निवडणूक लढविलीही जात नाही. त्याचप्रमाणे २०१४च्या पूर्वी असलेल्या मुद्द्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाहीत, असे शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी सांगितले.नाशिक येथे राऊत यांनी पत्रकारांशी गुरुवारी मुक्त संवाद साधला. विरोधी पक्षांकडे पंतप्रधानपदासाठी पाच उमेदवार आहेत, या छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी पाच उमेदवार पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत, याचाच अर्थ त्यांचा पराभव निश्चित आहे. कारण एकापेक्षा अधिक लोक पदासाठी इच्छुक असल्यास ते सरकार कायम कमकुवत असते. एनडीएमध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे एकमेव नाव निश्चित केले आहे, असे सांगून राऊत यांनी वंचित आघाडी ही भाजपची बी टीम असल्याच्या आरोपाचे खंडन केले. रिपाइंचे सर्व गट निस्तेज झाले असून, त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन रालोआत सामील व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.राज्यात काही जागांवर शिवसेना व भाजपच्या उमेदवारांनी बंडखोरी केली असली तरी, अशा बंडखोरांवर दोन्ही पक्षांकडून कारवाई केली जात आहे. स्थानिक पातळीवर काही मतभेद असतील तर ते स्थानिक पातळीवरच चर्चा करून मिटविण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSanjay Rautसंजय राऊतnashik-pcनाशिक