घोटी : पावसाळा सुरू झाला की राज्यातील पर्यटनात अग्रेसर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यातील पर्यटकांची पावले इगतपुरीकडे आकर्षित होतात. तालुक्यातील निसर्गाने नटलेल्या पर्वतरांगा, धरणे, गड-किल्ले, धबधब्यावर येण्यासाठी नाशिक, ठाणे, नगर, मुंबई येथील पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. यंदा निर्बंधांमुळे वीकेंडला निघालेल्या पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याने त्यांना आल्यापावली माघारी परतावे लागले.लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळलेल्या बालगोपाळांसह पर्यटनस्थळावर निघालेल्या कारचालकांना भावली, वैतरणा धरणाकडे तसेच हरिहर किल्ला याठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आल्याने अनेक पर्यटकांना माघारी परतावे लागले.कोरोना परिस्थितीमुळे पर्यटनस्थळ ठिकाणी प्रशासनाने निर्बंध घातले असल्याने पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते, मार्ग पोलिसांकडून बंद करण्यात आले आहेत. भावली धरणावर जाणारा रस्ता, घाटनदेवीपासून अशोका धबधबा, कसारा घाट, घाटनदेवी परिसर या ठिकाणी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या आदेशानुसार नाकाबंदी करून पोलिसांचा मोठा पहारा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या अनेक वाहनांना माघारी पाठविले गेले.स्थानिकांच्या रोजगारावर गंडांतरगेल्या वर्ष-दीड वर्षापासून लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसायांवर निर्बंध आले. त्यात पर्यटनावर तर मोठ्या प्रमाणात निर्बंध आल्याने पर्यटनावर आधारित व त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक व्यावसायिक, रोजगारांवर कुऱ्हाड कोसळून अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. एवढेच नव्हे, तर प्रवासबंदीमुळे, जिल्हाबंदीमुळे, पर्यटनबंदीमुळे रानमेवा व जंगली फळे विकून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कुटुंबांवरही उपासमारीची वेळ आली आहे.
वीकेंडला पर्यटनस्थळी प्रवेशबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 16:18 IST
घोटी : पावसाळा सुरू झाला की राज्यातील पर्यटनात अग्रेसर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यातील पर्यटकांची पावले इगतपुरीकडे आकर्षित होतात. तालुक्यातील निसर्गाने नटलेल्या पर्वतरांगा, धरणे, गड-किल्ले, धबधब्यावर येण्यासाठी नाशिक, ठाणे, नगर, मुंबई येथील पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. यंदा निर्बंधांमुळे वीकेंडला निघालेल्या पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याने त्यांना आल्यापावली माघारी परतावे लागले.
वीकेंडला पर्यटनस्थळी प्रवेशबंदी
ठळक मुद्देपोलीस बंदोबस्त : माघारी परतावे लागल्याने हिरमोड