शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

दिवसभर नाही सूर्यदर्शन! शहरावर ‘ओखी’ वादळाचा परिणाम दिवसभर आभाळ आणि पावसाची रिमझिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:50 IST

नाशिक : दक्षिण किनारपट्टीवरून पुढे सरकलेले ओखी चक्रीवादळ मंगळवारी (दि.५) गुजरातला धडकल्याने वादळाचा प्रभाव मुंबईसह नाशिकवरही मोठ्या प्रमाणात जाणवला. दिवसभर शहरावर मळभ दाटून आल्याने नाशिककरांना भास्कराचे दर्शन तर घडलेच नाही; मात्र रिमझिम पाऊस अन् थंड वाºयामुळे वातावरणातील गारठ्याने संपूर्ण दिवस हुडहुडीचा सामना करावा लागला.

ठळक मुद्देशहरावर ‘ओखी’ वादळाचा परिणाम दिवसभर आभाळ दिवसभर नाही सूर्यदर्शन : दिवसभर आभाळ आणि पावसाची रिमझिम

नाशिक : दक्षिण किनारपट्टीवरून पुढे सरकलेले ओखी चक्रीवादळ मंगळवारी (दि.५) गुजरातला धडकल्याने वादळाचा प्रभाव मुंबईसह नाशिकवरही मोठ्या प्रमाणात जाणवला. दिवसभर शहरावर मळभ दाटून आल्याने नाशिककरांना भास्कराचे दर्शन तर घडलेच नाही; मात्र रिमझिम पाऊस अन् थंड वाºयामुळे वातावरणातील गारठ्याने संपूर्ण दिवस हुडहुडीचा सामना करावा लागला.गेल्या तीन दिवसांपासून नाशिकच्या किमान तपमानात सातत्याने वाढ होत असून, १४ वरून पारा थेट १७ अंशांच्या पुढे गेला आहे. मंगळवारी १७.७ अंश इतके किमान तपमान शहरात नोंदविले गेले. एकूणच किमान तपमानात वाढ होत असली तरी नाशिककर मंगळवारी पहाटेपासूनच गारठले होते. ओखी वादळामुळे नाशिकमध्ये पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू होता. तसेच हवेत प्रचंड गारवाही निर्माण झाला होता.दक्षिण भारताच्या किनारपट्टीवरून पुढे सरक त ओखी वादळ गुजरातमध्ये पोहोचले आहे. यामुळे महाराष्टÑातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे, नंदुरबार आदी जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच वातावरणात कमालीचा बदल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे शहराचे जनजीवन प्रभावित झाले आहे. नाशिककरांना रेनकोटसह उबदार कपड्यांचाही वापर करावा लागला. दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. उबदार कपड्यांवर रेनकोट परिधान करून दुचाकीवरून महिला-पुरुष नोकरदार वर्ग कार्यालयांमध्ये मार्गस्थ होताना दिसून आले. एकूणच १७ अंशांच्या पुढे किमान तपमानाचा पारा असतानाही मंगळवारी नाशिककरांनी दिवसभर कडाक्याची थंडी अनुभवली.