शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लसीकरण केलेल्या  रुग्णांवर नाही गंभीर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 01:33 IST

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी कोविशिल्डच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आल्यानंतर दिलेल्या ७४५ लसींपैकी एकाही रुग्णास दुसऱ्या दिवशीदेखील कोणतेही गंभीर दुष्परिणाम ...

ठळक मुद्देजिल्ह्यात शनिवारी कोविशिल्डच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आल्यानंतर दिलेल्या ७४५ लसींपैकी एकाही रुग्णास दुसऱ्या दिवशीदेखील कोणतेही गंभीर दुष्परिणाम जाणवले नाहीत. 

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी कोविशिल्डच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आल्यानंतर दिलेल्या ७४५ लसींपैकी एकाही रुग्णास दुसऱ्या दिवशीदेखील कोणतेही गंभीर दुष्परिणाम जाणवले नाहीत. नाशिक जिल्ह्यात शनिवारी लसीकरण प्रक्रियेच्या प्रारंभाच्या दिवशी १३०० जणांना लस देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असताना प्रत्यक्षात केवळ ७४५ जणांनीच लस घेतली. लस न घेतलेल्यांमध्ये काहींनी पुढच्या टप्प्यात घेण्याचे कारण देत तर काहींनी प्रकृतीच्या कारणास्तव लस घेण्यास नकार दिला. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या पुढील लसीकरणावेळी कर्मचाऱ्यांनी लसीकरण टाळणे, पुढील टप्प्यात करण्याची विनंती करणे किंवा प्रकृतीच्या कारणास्तव लसच टाळण्याचे प्रकार कमी होतील, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी व्यक्त केला.शनिवारी लस दिलेल्या ७४५ आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी केवळ १० जणांना लसीकरणाचा किरकोळ त्रास झाला होता. मात्र, लस दिल्यानंतर संबंधित प्रत्येकाला किमान अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवले जात असल्याने त्याच वेळेत थोडासा त्रास झालेल्यांवर त्वरित उपचार करण्यात आल्याने ते लगेचच सामान्य स्थितीत परतले होते. त्यानंतर रविवारचा संपूर्ण दिवस संबंधितांना स्वत:बाबत दक्ष राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यापैकी किंवा अन्य कुणालाही कोणताही त्रास नसल्यामुळे या लसीबाबत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसह संपूर्ण समाजात सकारात्मक संदेश पोहोचला आहे. 

टॅग्स :NashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लस