शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता नाही, आरोग्य उपकेंद्र जवळ नाही; भरपावसात गरोदर मातेला डोलीतून घेऊन जाताना रस्त्यात झाली प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2023 17:58 IST

अनंत अडचणींचा सामना करावा लागला.

शाम धुमाळ, कसारा: एकीकडे देशभर राजकीय पुढारी व भारतीय जनता स्वतंत्रता अमृत महोत्सव साजरा करतोय तर दुसरीकडे याचं भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील आदिवासी जनता रस्ता,विज,,पाणी ,आरोग्य सारख्या सुविधा पासून वंचित असल्याने गरोदर माता असो वा अन्य गभीर आजारी त्यांना वैद्यकीय उपचारासाठी डोली करून 2 किलोमीटर दूरवर पायी प्रवास करावा लागतोय.2 किमी पायी प्रवास व तिथून पुढे वाहणाने इच्छित स्थळी जाण्याची वेळ आदिवासी बांधवावर येत आहे.

शहापूर तालुक्यातील पटकीचा  पाडा सुमारे 100 वर्षा पासून वसलेल्या शहापूर तालुक्यातील वेेळूक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या या  पाड्यात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या गावातील नागरिकाना दवाखाना,बाजारहाट साठी,दोन ते अडीच किलोमीटर पायी चालून डोंगर चढ उतार् करीत कसारा गाठन्याची वेळ येत आहे.

आज रविवारी दुपारी रस्ता नसल्याने  प्रसूती वेदना होत असताना प्रणाली गुरुनाथ वाजे या गरोदर मातेला डोली करून नेत असताना या आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रस्तूती झाली महीलेने एका गोडस बाळाला जन्म दिला. शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पटकीचा पाडा या आदिवासी पाड्यात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी होती रस्ता नसल्याने येथील रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे आज सकाळी 11 वाजता गरोदर महिलेच्या पोटात दुखायला लागल्याने अंगणवाडी मदतनीस अनिता भवर यांच्या मदतीने तिला कसारा रूग्णालयात नेण्यासाठी डोली करून घेऊन जात आसताना तिला रस्त्यात खूप त्रास होऊ लागला डोली घेऊन जाणाऱ्या आदिवासी बांधवांसोबत काही महिला देखील सोबत होत्या .गरोदर मातेला त्रास होऊ लागल्याने सोबत च्या महिलांनी डोली एका सुरक्षित ठिकाणी थांबवून गरोदर मातेच्या प्रसूती वेदना थांबवण्यासाठी प्रयत्न करीत असताना महिला प्रसूत झाली. प्रशासना च्या हलगर्जी पणा मुळे एका गरोदर मातेस अनंत अडचणी ला सामना करावा लागला .

प्रस्तुती नंतर पुन्हा बाळाला व मातेला डोली करून मुख्य रस्त्यावर 2 किमी पायी येऊन तिथून एका वाहणाने  कसारा रूग्णालयात दाखल करण्यात आले कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पल्लवी आखाडे ,परिचारिका सोनाली सांगळे यांनी तात्काळ बाळ व माता यांच्यावर योग्य उपचार सुरु करून रुग्णालयात दाखल करून घेतले.

अतिदुर्गम पटकीचा पाडा ते वेळूक वॉशाळा असा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर होउन् त्या रस्त्याचे तात्काळ काम सुरु करण्यात यावे यासाठी पाठपुरावा सुरु असून या प्रकरणी  मुख्यमंत्री महोदयांना.दूरध्वनी वर संपर्क करून माहिती देण्यात आली असून त्यांनी या प्रकाराची गभीर दखल घेतली आहे. पांडुरंग बरोरा. माजी आमदार.शहापूर

टॅग्स :Medicalवैद्यकीयNashikनाशिक