शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिसाद नाही : येत्या ८ फेबु्रवारीला उघडणार निविदा ‘स्मार्ट रोड’साठी फेरनिविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:35 IST

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या १.१ कि.मी. मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर केले जाणार असून त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांना अवघ्या एकाच एजन्सीकडून प्रतिसाद लाभला.

ठळक मुद्देप्रतिसाद मिळत नसल्याने कंपनी परेशानवायफायसारख्या सुविधाही उपलब्ध

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या १.१ कि.मी. मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रुपांतर केले जाणार असून त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांना अवघ्या एकाच एजन्सीकडून प्रतिसाद लाभला. त्यामुळे कंपनीने फेरनिविदा काढली असून येत्या ८ फेबु्रवारीला निविदा उघडण्यात येणार आहेत. डिसेंबर २०१७ पासूनच स्मार्ट रोडच्या कामाला सुरूवात करण्याचे नियोजन होते. परंतु, एजन्सीचा प्रतिसादच मिळत नसल्याने कंपनी परेशान झालेली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका या दरम्यानच्या १.१ कि.मी. मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रूपांतर केले जाणार असून, त्यात आकर्षक पथदीपांसह सायकल ट्रॅक व वायफायसारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आॅक्टोबर २०१७ पासून स्मार्ट रोडसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी महिनाभरात स्मार्ट रोडचे काम प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचा दावा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केला होता. मात्र, निविदा प्रक्रियेत एकच एजन्सीने प्रतिसाद नोंदवला. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान तीन एजन्सीचा सहभाग अपेक्षित असतो. परंतु, एकच एजन्सी पुढे आल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कंपनीने स्मार्ट रोडचा आराखडा तयार केलेला असून त्याचे सादरीकरण केपीएमजी या प्रकल्प सल्लागार संस्थेने यापूर्वीच केलेले आहे.कंपनीवर वाढता दबावपुढील वर्षी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्मार्ट सिटीची संकल्पना काही अंशी तरी जनतेसमोर प्रकट व्हावी, त्यातून काही प्रकल्प पूर्णत्वाला जावेत, याकरीता कंपनीच्या अधिकाºयांवर मोठा दबाव वाढला आहे. सन २०१८ मध्ये जास्तीत जास्त प्रकल्प लोकांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. मात्र, कंपनीचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट रोडलाच अद्याप मुहूर्त लागू शकलेला नाही. त्यामुळे कंपनीच्या अधिकाºयांमध्ये अस्वस्थता आहे.