शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

आणखी पाणीकपात नाहीच!

By admin | Updated: February 4, 2016 23:02 IST

पालकमंत्री ठाम : वाढीव आरक्षणासंबंधी मंगळवारी बैठक

नाशिक : पाणी वितरणाच्या योग्य व काटेकोर नियोजनावर भर देत नाशिककरांवर आणखी पाणीकपात लादायची नाही, या भूमिकेवर पालकमंत्री गिरीश महाजन ठाम असून, महापालिकेला वाढीव पाणी आरक्षणाबाबतचा फैसला येत्या मंगळवारी (दि.९) मुंबईत होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांनीही पत्रकारांशी बोलताना पाणीकपातीस विरोध दर्शवत पाणी वितरणातील त्रुटींवर बोट ठेवले आहे. गंगापूर धरणातील अत्यल्प पाणीसाठा लक्षात घेता महापौर अशोक मुर्तडक यांनी एकवेळ पाणीकपातीसोबतच आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश प्रशासनाला वारंवार देऊनही निर्णय घेतला जात नसल्याने पाणीप्रश्न राजकीय स्तरावर पेटला आहे. आणखी पाणीकपात करायची किंवा नाही, याबाबत अंतिम निर्णय होण्यासाठी बुधवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक निश्चित करण्यात आली होती. परंतु पालकमंत्री महाजन यांचे बुधवारी रात्री उशिराने नाशिकला आगमन झाले. दरम्यान, गुरुवारी सकाळी त्र्यंबकेश्वरला संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची महापूजा आटोपली.