शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मदत नको, पूररेषा शिथिल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:35 IST

शहरातील सराफबाजार गेल्या आठवड्यात रविवारी (दि.४) गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेला. या भागातील भांडी व्यापारी व जंगम व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशाप्रकारे वारंवार येणाऱ्या पुरांमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने व्यावसायिकांकडून पूररेषा शिथिल करून बाजार पेठ विकसित करण्यासाठी महापालिकेने परवानगी देण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देमहापुराचा फटका : नाले व्यवस्थापनाची मागणीबाजारपेठ विकसित करता येत नसल्याची व्यथा

नाशिक : शहरातील सराफबाजार गेल्या आठवड्यात रविवारी (दि.४) गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेला. या भागातील भांडी व्यापारी व जंगम व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशाप्रकारे वारंवार येणाऱ्या पुरांमुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याने व्यावसायिकांकडून पूररेषा शिथिल करून बाजार पेठ विकसित करण्यासाठी महापालिकेने परवानगी देण्याची मागणी होत आहे.शहरातील जुनी व ऐतिहासिक वारसा असलेल्या या बाजारातील व्यावसायिकांमध्ये बाजारपेठ विकसित करण्याची क्षमता आहे. परंतु, केवळ पूररेषेच्या कारणामुळे पैसा असूनही सराफ व्यावसायिकांना त्यांच्या पेढ्या विकसित करता येत नाही. प्रत्येक वेळी येणाºया पुराच्या नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी येणाºया प्रशासनाकडून पुराचे साचलेले पाणी गृहीत धरून पूररेषा निश्चित केली जाते. त्यामुळे सराफबाजारच पूर रेषेत आल्याने येथील व्यावसायिकांना येथील पेढ्या विकसित करता येत नाही. मात्र यासाठी महापालिकेचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून होत आहे. गोदावरी नदीला पूर आल्याने १९३९ पासून २००८ पर्यंत दोनदाच सराफबाजारात पुराचे पाणी घुसले होते. मात्र २००८ नंतर आतापर्यंत तब्बल सात ते आठ वेळा सराफबाजारावर पाणी फिरले. शहरातील वीसहून अधिक नैसर्गिक नाले व उपनद्यांचे पाणी थेट नदी पात्रात जाण्याचा मार्गात कृत्रिम अडथळे निर्माण झाल्यामुळेच जोरदार पाऊस होताच सराफबाजार पाण्याखाली जातो. याला सर्वस्वी महापालिकेचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा येथील व्यावसायिकांचा आरोप आहे.छोट्या कारागिरांवर उपासमारीची वेळसराफबाजारातील नागरे बंधू, मैंद सराफ, भगूरकर ज्वेलर्स, आंबेकर ज्वेलर्स, चिंतामणी ज्वेलर्स, सुहास अलंकार, आडगावकर सराफ, भावसार ज्वेलर्स याशिवाय अनेक लहान-मोठे कारागिरांचे मोठ्या प्रमाणात मशीनरीचे नुकसान झाले यात अनंता विसपुते, शेख पॉलिशवाले यांच्या मशीनरीचे मोटार खराब झाल्या, तर अनेक कारागिरांचे मशीनरी पूर्णपणे निकामी झाल्यात. काही छोट्या कारागिरावर उपासमारीची वेळ आलेली आहे. नाशिक सराफ असोसिएशन त्यांना मदतीचा हात देऊन त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत करीत आहेत.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरbusinessव्यवसाय