शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सहा पुलांवरून अवजड वाहनांना ‘नो एण्ट्री’

By admin | Updated: June 13, 2017 01:05 IST

खबरदारी : दारणा, गोदावरी नदीवरील पुलांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पावसाळ्याचे चार महिने जिल्ह्णातील धोकादायक झालेल्या पुलांवरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती कक्षाला लेखी पत्राद्वारे दिली आहे. पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतूक बंद करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.जिल्ह्णातील निफाड, सिन्नर, इगतपुरी, सुरगाणा, नांदगाव तालुक्यांतील गोदावरी, दारणा, पांझण तसेच गाव नाल्यांवरील एकूण सहा पुलांवरून अवजड वाहतूक रोखण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. निफाड तालुक्यातील गोदावरी नदीवरील चांदोरी ते सायखेडा गावास जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल, दारणा नदीवरील पांढुर्ली-भगूर रस्त्यावरील पूल, इगतपुरी तालुक्यातील दारणा नदीवरील घोटी गावाजवळील घोटी-सिन्नर राज्य मार्गावरील पूल, सौंदाणे-कळवण ते सुरगाणा राज्यमार्गावरील पूल, साक्री-कळवण राज्यमार्गावरील मनमाडजवळील नांदगाव तालुक्यातील पांझण नदीवरील पूल अशा एकूण सहा पुलांचा समावेश आहे. वरील सर्व पूल धोकादायक स्थितीत असून, या पुलांवरून अवजड वाहने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १ जूनपासून या पुलांवरून अवजड वाहतूक थांबविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे कळविले आहे; मात्र अद्याप घोटी-सिन्नर रस्त्यावरील पुलावरून तसेच सायखेडा रस्त्यावरील पुलासह अन्य पुलांवरूनदेखील अवजड वाहतूक सर्रासपणे सुरूच आहे. शहरासह जिल्ह्णात पावसाला सुरुवात झाली आहे. इगतपुरी, नांदगाव, सिन्नर तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होत असूनदेखील केवळ कागदावरच पुलांवरून अवजड वाहतूक बंद आहे; मात्र प्रत्यक्षात अवजड वाहतूक या धोकादायक पुलांवरून ‘जैसे थे’ सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.बांधकाम राज्यमंत्र्याच्या आदेशाकडे दुर्लक्षच्निफाड तालुक्यातील सायखेडा गावाला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाची गेल्या वर्षी पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे दुरवस्था झाली होती. यामुळे सदर पूल धोकादायक बनला आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी असे आदेश फेब्रुवारी महिन्यात सार्वजनिक बांधकाम भवनामध्ये झालेल्या आढावा बैठकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते; मात्र अद्याप पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला प्रशासनाला मुहूर्त मिळाला नसून लेखी पत्र काढून सार्वजनिक बांधकाम विभागाने अवजड वाहतूक बंद केल्याचेही जाहीर केले आहे. याबाबत कुठलाही सूचना फलक पुलाच्या प्रारंभी लावण्याची तसदी अद्याप घेण्यात आली नसून अवजड वाहतूकही सुरूच आहे.