शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे सहायक अभियंता पाटील अद्यापही बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:09 IST

गेल्या दोन दिवसांपासून आश्चर्यकारकरीत्या बेपत्ता झालेले महापालिकेचे सहायक अभियंता रवि पाटील हे अद्यापही बेपत्ताच असून, पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तीन पथके तयार केली आहेत. विशेष म्हणजे पाटील हे रेल्वेने कुठेतरी गेले असल्याची शक्यता गृहित धरून रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली असल्याचे समजते.

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून आश्चर्यकारकरीत्या बेपत्ता झालेले महापालिकेचे सहायक अभियंता रवि पाटील हे अद्यापही बेपत्ताच असून, पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तीन पथके तयार केली आहेत. विशेष म्हणजे पाटील हे रेल्वेने कुठेतरी गेले असल्याची शक्यता गृहित धरून रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली असल्याचे समजते.  शनिवार, दि. २६ रोजी सहायक अभियंता रवि पाटील (४२) हे महापालिकेच्या कामासाठी पहाटे घराबाहेर पडल्यानंतर काही वेळातच त्यांच्या पत्नीला घराबाहेरच त्यांची कार उभी असल्याचे आणि त्यामध्ये त्यांचा मोबाइल, पाकीट तसेच एक चिठ्ठी आढळली होती. कार्यालयीन कामकाजाला कंटाळून आपण जीवन संपवत असल्याच्या मजकूर या चिठ्ठीत लिहला असल्याने त्यांच्या पत्नी शीतल पाटील यांनी तत्काळ गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत पती रवि पाटील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली असून, रविवारी संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता. याप्रकरणी तपासी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पोलिसांच्या तीन पथकांमार्फत शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही मात्र त्यांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा आणि रेल्वे पोलीसदेखील प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले.  पाटील यांना शनिवारी सकाळी रेल्वेस्थानकावर पाहण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी रेल्वेला याबाबतची माहिती कळविली असून, रेल्वेपोलीस स्थानकांवरील सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतआहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांचीदेखील मदत घेतली जात आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वॉक विथ कमशिनर या कार्यक्रमाला जाण्यासाठी पाटील शनिवारी सकाळी घराबाहेर पडले ते परतलेच नाही.कुटुंबीय चिंतितअभियंता पाटील हे चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतित असले तरी पाटील हे शांत स्वभावाचे असल्याने ते कोणतेही टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, असा विश्वासही व्यक्त केला आहे. कुटुंबीयांकडून मिळणाºया माहितीवरून तपास वेगाने सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका