शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

मनपा शाळांच्या वेळा आता बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:48 IST

नाशिक : महापालिका शाळांच्या एकत्रीकरणानंतर सर्व शाळा सकाळच्या सत्रात करण्यात आल्या असल्या तरी त्याचे बरे-वाईट परिणाम लक्षात घेता महापालिकेने सध्या ज्या शाळा आठ ते दोन या वेळेत भरत होत्या त्या अकरा ते चार या वेळात भरविण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

नाशिक : महापालिका शाळांच्या एकत्रीकरणानंतर सर्व शाळा सकाळच्या सत्रात करण्यात आल्या असल्या तरी त्याचे बरे-वाईट परिणाम लक्षात घेता महापालिकेने सध्या ज्या शाळा आठ ते दोन या वेळेत भरत होत्या त्या अकरा ते चार या वेळात भरविण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अक्षयपात्र योजनेलादेखील सदस्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. अर्थात त्यासंदर्भात महासभेतच अंतिम निर्णय होणार आहे.महापालिकेच्या शिक्षण समितीची बैठक सभापती प्रा. सरिता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.९) पार पडली. यावेळी उपसभापती प्रतिभा पवार तसेच शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी उदय देवरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. महापालिकेच्या शाळांचे एकत्रीकरण करण्यात आले असले तरी काही शाळा वेगळ्या करून पूर्ववत करण्याची मागणीदेखील यावेळी सदस्यांनी केली, मात्र त्याबाबत शासनाला विनंती करून काही प्रमाणात बदल होऊ शकतील, असे प्रशासनाधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्यावर्षी तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी महापालिकेच्या शाळांचे एकत्रिकीकरण करून १२७ शाळांच्या एकूण ९० शाळा केल्या होत्या. त्यानंतर सर्वच प्राथमिक शाळा सकाळी असल्याने महापालिकेच्या शाळांची वेळदेखील सकाळीच करण्यात आली होती. मात्र, सकाळची वेळ ही सर्वच शाळा आणि पालकांसाठी सोयीची नाही. तसेच काही ठिकाणी मोलमजुरी करणाºया पालकांची मुले दुपारी शाळा सुटल्यानंतर मोकळी असतात, त्यामुळेदेखील सामाजिक प्रश्न निर्माण होत असतो. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या काही शाळांच्या वेळा बदला अशी सभापती सरिता सोनवणे यांची इच्छा होतीच, परंतु त्याच राहुल दिवे, चंद्रकांत खाडे, संतोष गायकवाड यांनीदेखील गरजेनुसार शाळांच्या वेळा बदलाव्यात, अशी मागणी केली. त्यानुसार महापालिकेच्या काही शाळा सात ते बारा, काही आठ ते दोन या वेळात भरतात पैकी आठ वाजता भरणाºया सर्व शाळा ११ ते ४ या वेळेत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांची बैठक घेऊन याबाबत निर्णयाची माहिती देतानाच शाळेतील अडचणींचादेखील आढावा घेण्याचे ठरविण्यात आले.देशात अनेक ठिकाणी असलेली अक्षयपात्र ही मध्यान्ह भोजनाची योजना राबविण्याबाबत शासनाने गेल्यावर्षीच आदेश दिले आहेत. त्यात स्थानिक बचत गटांचा समावेश करून ही योजना राबविण्याचा मनोदय प्रशासनाधिकारी उदय देवरे यांनी व्यक्त केला. त्याला सर्वच सदस्यांनी मान्यता दिली. सदरच्या योजनेअंतर्गत अत्यंत आरोग्यदायी पध्दतीचे भोजन देता येते, टाटा किंवा इस्कॉन यांसारख्या संस्था त्यासाठी पुढाकार घेतला आहे. नाशिकमध्य बचत गटात काम करणाºया महिलांपैकी स्वयंपाकी आणि मदतनीस म्हणून काही महिलांना मुलाखतीव्दारे निवडले जाऊ शकते. तसेच त्यांना किमान सहा ते दहा हजार रुपये वेतन मिळू शकते, असे देवरे यांनी सांगितले व ही मध्यान्ह भोजन योजना अमलात आल्यानंतर दोन हजार मुले पटसंख्येवर वाढू शकेल. शेवटी मुलांच्या भोजनासाठी ही योजना असून बचत गटांच्या रोजगारासाठी नव्हे असेही देवरे यांनी स्पष्ट केले. यावर चंद्रकांत खाडे यांनी इगतपुरी तालुक्यातील मुंडे गाव येथे सेंट्रल किचन योजना यशस्वीरीत्या राबविल्या जात आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी दौरा करण्याची सूचना केली. अक्षयपात्र योजनेअंतर्गत लवकरच सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर महासभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. आनंदवली येथील मनपाच्या शाळेच्या आवारात खासगी शाळा असून तेथे विद्यार्थ्यांना आमिष देऊन आपल्या शाळेत ओढण्यात येते. त्याचप्रमाणे महापालिकेच्या येथील शाळेत नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करावेत, अशी मागणी संतोष गायकवाड यांनी केली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रतिभा पवार, सुदाम डेमसे यांनीही भाग घेऊन विविध सूचना केल्या.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका