शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्याचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 01:06 IST

नाशिक : शहरातील रोगराई वाढत असून, डेंग्यूचे रुग्ण कमी होण्याचे नाव घेत नसताना महापालिकेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांच्या वाहनचालकाचाच स्वाइन फ्लूनेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे मेट्रोपोलीस लॅबचा अहवाल महापालिका प्रशासनाने मान्य केला आहे. शहरात आतापर्यंत पाच जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट आहे.

नाशिक : शहरातील रोगराई वाढत असून, डेंग्यूचे रुग्ण कमी होण्याचे नाव घेत नसताना महापालिकेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांच्या वाहनचालकाचाच स्वाइन फ्लूनेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे मेट्रोपोलीस लॅबचा अहवाल महापालिका प्रशासनाने मान्य केला आहे. शहरात आतापर्यंत पाच जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट आहे.शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलजन्य आजाराबरोबरच अन्य आजारांची लागण वाढत असून, केवळ डेंग्यूचे सव्वादोनशे रुग्ण आहेत. वडाळा परिसरात चिकुनगुन्याचे पंधराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यात आता स्वाइन फ्लूनेदेखील डोके वर काढले आहे.महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांचे मनपाचे वाहनचालक असलेल्या गायकवाड यांचा दि. ३१ जुलै रोजी स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला. गायकवाड यांना स्वाइन फ्ल्यू झाल्याचे निदान मेट्रोपोलीस लॅबने केले आहे. पुण्याच्या विषाणू संशोधन संस्था या शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय महापालिका कोणत्याही आजाराला दुजोरा देत नसून गायकवाड यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान करता येत नसल्याने मृत गायकवाड यांचे स्वॅप नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. मात्र, मेट्रोपोलीस लॅबही खासगी शासन नोंदणीकृत असल्याने त्यांच्याकडूनही प्राप्त झालेला गायकवाड यांचा तपासणी अहवाल वैद्यकीय आरोग्य विभागाने अखेर ग्राह्य धरला.

टॅग्स :Healthआरोग्यSwine Flueस्वाईन फ्लू