शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

हरित महामार्गामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत :  नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 02:02 IST

रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडली जातात, या झाडांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केले जातात; मात्र ते फारसे यशस्वी होत नाहीत़ तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावणे आवश्यक असून, यासाठी ‘हरित महामार्ग’ प्रकल्पाचा संकल्प करण्यात आला आहे़

नाशिक : रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडली जातात, या झाडांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केले जातात; मात्र ते फारसे यशस्वी होत नाहीत़ तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावणे आवश्यक असून, यासाठी ‘हरित महामार्ग’ प्रकल्पाचा संकल्प करण्यात आला आहे़ येस बँकेच्या सीएसआर फंडातून हरित पथ कंपनीने मुंबई-आग्रा महामार्गावर ४५ हजार झाडे लावण्यात आली आहेत़ देशातील विविध कंपन्या, एनजीओ, शैक्षणिक संस्था, बँका यांनी हरित महामार्गासाठी पुढाकार घेतल्यास देशापुढील पाणी व वायू प्रदूषण कमी करण्यास मदत मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केले़  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील देशातील पहिल्या हरित महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते बुधवारी (दि़ २४) झाले, त्यावेळी ते बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, येस बँकेने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील पिंपळगाव ते गोंदे व गोंदे ते घोटी हा ४० किलोमीटरचा रस्ता हरित महामार्गासाठी दत्तक घेतला  आहे़  बँकेच्या या फंडातून हरित पथ या कंपनीने आॅक्टोबर २०१७ पासून कामास सुरुवात केली असून, रस्त्याच्या दुतर्फा ११ हजार ७९० तर मध्यभागी ३० हजार वृक्ष लावले आहेत़ या मार्गावरील एकूण वृक्षांची संख्या ४५ हजार ३७२ असून, पाच वर्षे या वृक्षांचा सांभाळ केला जाणार आहे़  हरित पथ कंपनीचे संचालक तथा भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी सांगितले की, वृक्षारोपणापूर्वी ड्रोनने रस्त्याचा सर्र्व्हे करण्यात आला होता़ या वृक्षांच्या संगोपनाच्या माहितीसाठी अ‍ॅप बनविण्यात आले असून, रिअल टाइम मॉनेटरिंग होते व बँकेच्या अधिकाऱ्यांना ते बॅँकेतून पाहता येते़ यावेळी गडकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले़ लोकार्पण सोहळ्यास येस फाउण्डेशनच्या प्रेरणा लांगा, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, अमोल जोशी आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते़

टॅग्स :environmentवातावरणNitin Gadkariनितीन गडकरी