शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

‘निर्भया’चा दणका : रिक्षात विसरलेला मोबाईल पुन्हा देण्यासाठी एक हजाराची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 20:56 IST

तिने मैत्रिणीच्या मोबाईलवरून स्वत:च्या मोबाईलवर संपर्क केला. यावेळी रिक्षाचालक संशयित जगन्नाथ लक्ष्मण दिवे याना तिला ‘मोबाईल हवा असेल तर १ हजार रूपये घेऊन तू गिरणारे गावात ये’ असे सांगितले

ठळक मुद्देनिर्भया पथकाने रिक्षाचालक व त्याच्या मित्रास ताब्यात घेतले२२ हजार रूपये किंमतीचा स्मार्टफोन रिक्षातच राहिला

नाशिक : शहरातील अशोकस्तंभ येथून रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन तरूणीचा मोबाइल त्या रिक्षात अनावधानाने राहिला. रिक्षाचालकाने तीचा मोबाईल ताब्यात घेतला. तरूणीने त्या मोबाईलवर संपर्क साधला असता त्या रिक्षाचालकाने तीला थेट गिरणारे गावात एक हजार रूपये घेऊन बोलविले. त्यामुळे तरूणीला धक्का बसला व तिने वारंवार विनंती करूनदेखील रिक्षाचालकाने मोबाईल देण्यास नकार दिला. त्यामुळे तरूणीने त्या रिक्षाचालकाची तक्रार थेट निर्भया पथक क्रमांक-२सोबत संपर्क साधत मदत मागितली. त्यानंतर निर्भया पथकाने थेटे गिरणारे गाव गाठून  रिक्षाचालक व त्याच्या मित्रास ताब्यात घेतले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कॉलेजरोड परिसरातील एका महाविद्यालयात शिकणारी व येथील मुलींच्या वस्तीगृहात राहणारी विद्यार्थिनी सोमवारी (दि.२१) खरेदी करून अशोकस्तंभ येथून रिक्षामध्ये (एम.एच १५ ईएच ४३८३) वस्तीगृहात जाण्यासाठी बसली. रिक्षातून उतरल्यानंतर तिने रिक्षाचालकाला भाड्याचे पैसे दिले या दरम्यान, ती स्वत:चा महगडा मोबाईल रिक्षामध्येच विसरली. वसतीगृहात पोहचल्यानंतर तिच्या लक्षात आले की २२ हजार रूपये किंमतीचा स्मार्टफोन रिक्षातच राहिला आहे. तिने मैत्रिणीच्या मोबाईलवरून स्वत:च्या मोबाईलवर संपर्क केला. यावेळी रिक्षाचालक संशयित जगन्नाथ लक्ष्मण दिवे याना तिला ‘मोबाईल हवा असेल तर १ हजार रूपये घेऊन तू गिरणारे गावात ये’ असे सांगितले. त्यामुळे तत्काळ विद्यार्थिनीने निर्भया पथकाशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तत्काळ सहायक निरिक्षक संगीता गावीत, उपनिरीक्षक राजकुमार तडवी, हवालदार सुभाष पाडवी, संजय कासर्ले, मयुरसिंग राठोड, जयश्री राठोड यांच्या पथकाने गिरणारे गाव गाठले. रिक्षाक्रमांकावरून संशयित दिवे व त्याचा साथीदार गोपीनाथ लक्ष्मण गोलाड यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी मोबाईल काढून दिला. दोघांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिसांच्या हवाली केले आहे.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयWomenमहिलाauto rickshawऑटो रिक्षाArrestअटक