शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात निफाडचे राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:12 IST

सायखेडा : शिवसेना पक्षाचे शिवसंपर्क अभियान, राष्ट्रवादी काँग्रेसची युवा संवाद यात्रा तर भाजप प्रवेशानंतर यतीन कदम यांच्या सुरू असलेल्या तळागाळातील गाठीभेटी यामुळे निफाड तालुक्यातील राजकारण ऐन पावसाळ्यात तापले आहे. सोशल मीडियावर विविध कार्यक्रमांच्या पोस्टने धुमाकूळ घातला असल्याने तीन वर्षे अगोदरच निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसायखेडा : पक्षीय कार्यक्रमाच्या निमित्ताने निवडणुकांची मोर्चे बांधणी

सायखेडा : शिवसेना पक्षाचे शिवसंपर्क अभियान, राष्ट्रवादी काँग्रेसची युवा संवाद यात्रा तर भाजप प्रवेशानंतर यतीन कदम यांच्या सुरू असलेल्या तळागाळातील गाठीभेटी यामुळे निफाड तालुक्यातील राजकारण ऐन पावसाळ्यात तापले आहे. सोशल मीडियावर विविध कार्यक्रमांच्या पोस्टने धुमाकूळ घातला असल्याने तीन वर्षे अगोदरच निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे दिसून येत आहे.निफाडचेराजकारण हे नेहमीच जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत राहिले आहे. अनेक वर्षे गटा-गटात विस्तारलेले राजकारण अलीकडे पक्षीय राजकारणाच्या भोवती पिंगा घालत आहे. मोगल-बोरस्ते गट, मोगल-पवार गट असे अनेक वर्षे गटाचे राजकारण निफाड तालुक्यातील जनता अनुभवत आली आहे. मालोजीराव मोगल आणि माणिकराव बोरस्ते यांच्यानंतर मात्र काही वर्षांपासून बनकर-कदम यांच्या भोवती राजकारण फिरायला लागले. मंदाकिनी कदम यांच्या आठ वर्षे आमदारकीनंतर मात्र माजी आमदार अनिल कदम आणि विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या गटात राजकारण सुरू झाले. काका-अण्णा यांच्यातील विळ्या भोपळ्याचे राजकारण सर्व तालुका जाणून आहे. दोन वेळा बनकर यांचा पराभव झाल्यानंतर विजयासाठी कंबर कसलेल्या बनकर यांचा वारू विधानसभेत पोहचला. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असले तरी तालुक्यातील जनतेला मात्र पारंपरिक विरोधकांची छबी वारंवार पहायला मिळते आहे.विविध विकास कामांच्या श्रेयवादावरून सोशल वॉर सातत्याने सुरू असते. कोणीच मागे हटायला तयार नसतो. आता मात्र शिवसेना पक्षाने शिवसंपर्क अभियान कार्यक्रमांतर्गत कार्यकत्यांशी संवाद साधून पक्ष संघटना बळकटीवर भर दिला आहे. माजी आमदार अनिल कदम यांनी तालुका पिंजून काढत कार्यकर्त्यांतील मरगळ झटकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.आमदार दिलीप बनकर यांनी रासाका, ड्रायपोर्ट यासारखे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावत संपर्क वाढवला आहे. त्यात भर म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नुकतेच युवा संवाद कार्यक्रम हाती घेऊन काम गाव पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम सुरु केले आहे. सहा गटात संवाद यात्रा निमित्ताने कार्यकर्ते जुळवत आहेत.तर भाजप पक्षात यतीन कदम यांनी नुकताच प्रवेश केला. त्यांनी गावागावात जाऊन कार्यकर्ते आणि माजी आमदार रावसाहेब व मंदाकिनी कदम यांचे विखुरलेले कार्यकर्ते गोळा करून पुन्हा एकदा गट निर्मिती करत असल्याचे प्रयत्न सुरू केले आहे.शिवसंपर्क अभियान, युवा संवाद कार्यक्रम आणि यतीन कदम यांच्या गाठीभेटी यामुळे निफाड तालुक्यातील राजकारण ऐन पावसाळ्यातदेखील तापले आहे 

टॅग्स :nifadनिफाडPoliticsराजकारण