शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नऊ गावे, दहा वाड्यांसाठी सहा टॅँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:48 IST

चांदवड : तालुका परिसरात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. सध्या तालुक्यातील नऊ गावे व दहा वाड्यांना सहा टॅँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, पाणीपुरवठा विभागाचे सी.पी. मोरे, सोमनाथ भोसले यांनी दिली.

ठळक मुद्देचांदवड : पाऊस न झाल्याने तालुक्यातील गावांना दिवसाआड पाणीपुरवठा टॅँकरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चांदवड : तालुका परिसरात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी स्थिती आहे. सध्या तालुक्यातील नऊ गावे व दहा वाड्यांना सहा टॅँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, पाणीपुरवठा विभागाचे सी.पी. मोरे, सोमनाथ भोसले यांनी दिली.हिरापूर, बोपाणे, कळमदरे, परसूल, उसवाड, नांदूरटेक, देवरगाव, भोयेगाव, जोपूळ या नऊ गावांना, तर हिरापूरची धनगरवाडी, तळेगाव रोहीची दत्तवाडी, बजरंगनगर, घुमरे वस्ती, काजीसांगवीचे दुर्गानगर, नांदूरटेकची चिंचबारी, शिंगवेची झाल्टे व मढे वस्ती, रामवाडी, खताळ वस्ती, शिंदे व खताळ वस्ती, भाटगावची माळीवस्ती या दहा वाड्यांवर पाणीटंचाई असल्याने टॅँकर सुरू आहेत. काही गावांना दोन, तर काही गावांना टँकरची एक खेप सुरू आहे. तालुक्यातील काही गावांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, असे पाणीपुरवठा विभागामार्फत सांगण्यात आले.गेल्या दोन वर्षांपूर्र्वी जून ते जुलै महिन्यापर्यंत टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. तर यंदाच्या वर्षी पाणीटंचाई भीषण असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. टॅँकरची संख्या वाढणारगेल्या वर्षी बऱ्याच गावांमध्ये जलयुक्तची कामे झाल्याने परिसरातील बंधारे व विहिरींमध्ये पाणी टाकण्यात आले होते. मात्र यंदा मार्चपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. एप्रिल- मेमध्ये पाणीटंचाईचे भीषण चित्र असेल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. पाणीटंचाईची तीव्रता जसजशी वाढेल तशी टॅँकरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.