शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

पाटणेत नऊ बाधित; पाच दिवस गाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:15 IST

पाटणे येथे जवळ जवळ ४० रिक्षा असून, गेल्या शंभर दिवसांपासून रिक्षा बंद असल्याने आपली उपजीविका भागविण्यासाठी दुसरा व्यवसाय शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशीच अवस्था अनेक व्यावसायिकांची आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा सतर्क; बाहेरगावाहून येणाऱ्यांना बंदी

लोकमत न्यूज नेटवर्कपाटणे : येथे कोरोनाविषाणू बाधित चार रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली असताना. शुक्रवारी पुन्हा पाच रुग्णाचा अहवाल कोरोनाबाधित आल्याने पाटणे येथील ग्रामस्थांनसाठी वाढती बाधिताची संख्या धोक्याची ठरू पहात आहे.शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात एक ५४वर्षीय महिला त्यानंतर प्राप्त झालेल्या अहवालात ६० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला आणि २८ वर्षांचा युवक यांचा समावेश आहे. एकूण १७ रुग्णांच्या घशाचे नमुने (स्वॅब) तपासणीसाठी पाठवले असता. त्यातील पाच रुग्ण कोरोनाबाधित आढल्याने पाटणे येथील रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली आहे.पाटणे ग्रामपंचायतीच्या वतीने ३ ते ७ जुलैदरम्यान पाच दिवसांसाठी गाव बंद ठेवण्यात आले असून, काल बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली. पाटणे येथे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने बांधित रुग्णांचा संपर्क कोणाकोणाशी झाला त्याची माहिती जमा करून ही सांखळी खंडित करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

चांदवडला नवीन तीन रुग्णचांदवड शहरातील २६ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, ३२ वर्षीय महिला असे तीन जण कोरोनाबाधित रुग्ण आढळलेअसल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील ५४ वर्षीय पुरु ष व ५१ वर्षीय महिला यांचे अहवाल बुधवारी (दि. १) प्राप्त झाले होते. दोन्हीही अहवाल पॉझिटिव्ह आले होते. सदर पुरु ष कर्मचारी हे एसटी महामंडळ नाशिक कार्यशाळा येथे कार्यरत होते. त्यांचे कुटुंबातील इतर दोन व्यक्ती यांचेसुद्धा नमुने घेतले होते. त्यात २६ वर्षीय मुलगा, २८ वर्षीय मुलगी आहे, तर त्यांच्यावर खासगी ३२ वर्षीय महिला कंपाउण्डरने उपचार केले होते. असे तीन जण आज दि. ३ जुलै रोजी सध्यांकाळी सहा वाजता पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. नागरिकांनी आवश्यकता असल्यासच बाहेर पडावे. घाबरून जाऊ नये; परंतु काळजी घ्यावी, असे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या