शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

निलगिरी बाग दंगल; दहा जणांवर गुन्हा

By admin | Updated: October 16, 2015 21:40 IST

औरंगाबादरोडवरील घटना : दगडफेकीत दोन जण जखमी

पंचवटी : औरंगाबादरोडवरील निलगिरी बाग मरीमाता मंदिराजवळ सुरू असलेल्या दांडिया कार्यक्रमादरम्यान गाणे वाजविण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी व दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमाराला घडली.या घटनेत दोघेजण जखमी झाले असून दगडफेक करीत उभ्या वाहनांच्या तसेच घरांच्या काचा फोडल्या प्रकरणी एकूण १० संशयितांवर परस्परविरोधी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सर्व संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे निलगिरी बाग येथील घरकुल आवास इमारतीत रात्री उशिरा तणावाचे वातावरण पसरले असल्याने पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निलगिरी बाग येथील मरीमाता मंदिराजवळ नवरात्रोत्सवानिमित्ताने दांडियाचे आयोजन केले असून गुरुवारी रात्री दांडिया कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एक गाणे लावावे या कारणावरून दोन गटात वाद झाले. त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते घरकुल योजनेच्या बिल्डिंग क्रमांक ५ व ६ येथे उभे असताना दगडफेक सुरू झाली. यात दोन्ही गटाच्या संशयितांनी परस्परांच्या घराच्या, वाहनांच्या काचा फोडल्या. या घटनेत भारत रघुनाथ वळवी, दीपक रघुनाथ वळवी असे दोघेजण जखमी झाले आहेत. या घटनेबाबत निलगिरी बाग येथे राहणाऱ्या दीपक वळवी व संजय सदावर्ते यांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली असून दीपक वळवी, शैलेश झनकर, सुनील खरात, मच्छिंद्र पवार, जितू झनकर, देवा अहिरे, विकास लहाने,जीवन शिंदे, दलुचंद सोनवणे, संजय सदावर्ते अशा दहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. मनपा प्रशासनाने बांधलेल्या या घरकुल आवास योजनेच्या इमारतीत निलगिरी बाग तसेच फुलेनगर झोपडपट्टीतील लाभार्थी राहत असल्याने व त्यातच एकमेकांवर वर्चस्व निर्माण करण्याच्या कारणावरूनच रात्री ही दंगल घडल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)