कळवण : दुष्काळाच्या झळा अल्प असल्याने शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या कागदावर कळवण तालुका इतर टंचाईग्रस्त तालुक्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती असलेला आहे. मात्र कातळगाव येथील आदिवासी बांधवानी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करून गावात पाणीच नसल्याने पाणी आणायचे कुठून असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.टँकरमुक्त कळवण तालुका अशी ओळख असलेल्या या तालुक्यात आता टँकरची मागणी होत आहे. ग्रुप ग्रामपंचायत मोहनदरी अंतर्गत कातळगावमध्ये गेल्या मिहन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई असून महिलांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे शिवाय रात्री बेरात्री फक्त पाण्यासाठी दीड किलोमीटर भटकंती करावी लागत असल्याची कैफियत कातळगावच्या गुलाबीबाई जोपळे व अरु णाबाई जोपळे यांनी मांडली.जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी यांच्या नेतृत्वाखाली कातळगाव येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया व तहसीलदार बंडू कापसे यांची भेट घेऊन कातळगाव येथील पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आणून दिले असून सध्या विहीर व बोअरवेलला पाणी नसल्याने महिलांनी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित केला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने कातळगावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून रात्री एक ते दीड किलोमीटर पायपीट करून पाणी आणावे लागत आहे.पाण्याचा उग्र प्रश्न निर्माण झाल्याने रोजंदारीवर कामावर जाणार्यांना काम सोडून पाण्यासाठी घरी थांबून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा लागत आहे. त्यामुळे कातळगावचा पाचवीला पुजलेला पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन पाणी प्रश्नांची सोडवणूक करावी अशी मागणी कातळगाव येथील शिष्टमंडळाने केली.यावेळी शिष्टमंडळात संजय चव्हाण, रवींद्र चव्हाण, दिलीप जोपळे, गुलाब बिहरम, लक्ष्मण हाडस, देविदास जोपळे, पोपट पवार, उत्तम खांडवी, गोविंद बागुल, परशराम गवळी, कृष्णा गवळी, बापू चव्हाण, पंडित बिहरम, गुलाबीबाई जोपळे, अरु ण जोपळे, शांताराम बिहरम, दत्तू जोपळे, शिवाजी चव्हाण, आनंदा जोपळे, सुरेश चव्हाण, प्रभू चव्हाण आदी सहभागी झाले होते.ग्लासभर पाण्यासाठी भटकंती -शासनाच्या कागदावर कळवण हा सुजलाम, सुफलाम आण िपाण्याने विविधतेने नटलेला संपन्न व सधन तालुका आहे ,परंतु वास्तव मात्र वेगळेच आहे. आदीवासी भागातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी नाही. दोन -चार किलोमीटरच्या परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरींना थोडेफार पाणी आहे. मात्र गावाच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी कोरड्या पडल्याने पाण्यासाठी भटकण्याची वेळ या भागातील ग्रामस्थांवर आली आहे. आदिवासी वस्ती- पाडे, गाव-वस्तींना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत; पंरतु विहीर तसेच विंधन विहिरींना पाणी नाही. कारण या भागातील नैसिर्गक नदी-नाले, बंधारे, तलाव, पाणी अडवून जिरवण्याचे छोटे बंधारे, विहिरी कोरड ठाक पडलेले आहेत,शिरसमणीचा दिनक्र म पाण्याभीवती -शिरसमनी गावात तर गावाजवळील शेतात शेतकर्?याचे पाणी सुरु झाले की, घरात असेल-नसेल ते रिकामे भांडे भरु न घेण्यासाठी महिलांची सकाळी सकाळी धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्र म पाण्याभोवती केंद्रित झाला आहे. पाणी आपल्याला मुबलक मिळाले पाहिजे, अशी मानिसकता झालेली आहे. पण विखुरलेल्या लोकवस्त्यांवर आळी-पाळीने दररोज पाणी पुरवताना ग्रामपंचायतींना देखील कसरत करावी लागत असून यंत्रणेला ग्रामस्थांना तोंड देतांना नाकीनऊ आले आहे . ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे दर दिवशी अर्धा तास पाणी नळांना दिले जाते. काही भागात ते मिळते तर काही भागात तेही मिळत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना आपल्यावर पाणी पुरवताना अन्याय होत असल्याची भावना वाढीस लागत आहे.
रात्री बेरात्री पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:03 IST
कळवण : दुष्काळाच्या झळा अल्प असल्याने शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या कागदावर कळवण तालुका इतर टंचाईग्रस्त तालुक्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती असलेला आहे. मात्र कातळगाव येथील आदिवासी बांधवानी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करून गावात पाणीच नसल्याने पाणी आणायचे कुठून असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
रात्री बेरात्री पाण्यासाठी भटकंती
ठळक मुद्देकळवण : टँकरमुक्त तालुक्यात कातळगावला टँकरची मागणी