शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मुंबई-नागपूरच्या आधी मालेगाव येथे ‘नाइट लाइफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:08 IST

महाविकास आघाडीने मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि नागपूर शहरातूनही नाइट लाइफची मागणी होत आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मालेगाव शहराच्या पूर्व भागात रात्रीचा दिवस होत असल्याने खऱ्या अर्थाने ‘नाइट लाइफ’ अमलात आणणारे मालेगाव हे प्रथम शहर ठरले असावे.

ठळक मुद्देखवय्यांना मेजवानी : यंत्रमाग कामगाराची वर्दळ असल्याने व्यवसाय तेजीत

शफीक शेख।मालेगाव : महाविकास आघाडीने मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि नागपूर शहरातूनही नाइट लाइफची मागणी होत आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मालेगाव शहराच्या पूर्व भागात रात्रीचा दिवस होत असल्याने खऱ्या अर्थाने ‘नाइट लाइफ’ अमलात आणणारे मालेगाव हे प्रथम शहर ठरले असावे.मालेगावच्या पूर्व भागात रात्री यंत्रमागाचा खडखडाट सुरू असतो त्यामुळे या भागात रात्री हॉटेल्ससह दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. यंत्रमागावर काम करणारे मजूर हॉटेल्सवर मोठ्या संख्येने हजेरी लावतात त्यामुळे रात्री यंत्रमाग कामगारांना यंत्रमागांवर काम करतानाच विरंगुळा म्हणून ‘ब्रेक’ घेण्याकरिता हॉटेल्सवर चहापानासाठी कामगार एकत्र आलेले दिसतात. यावेळी मालेगावच्या पश्चिम भागात सर्वत्र शांतता असते तर पूर्व भागात दैनंदिन वर्दळ रात्री उशिरापर्यंत सुरू असते किंबहुना बाहेरगावाहून आणि पश्चिम भागातून मोठ्या संख्येने खवय्ये हॉटेल्सवर गर्दी करीत असतात. बाहेरगावाहून शहरात येणारा प्रवासी त्यामुळे उपाशी राहत नाही. रमजान ईदसह शब-ए-बारातसारख्या सणांच्या दिवशी रात्री रस्ते फुलून गेलेले असतात. रमजान महिन्यात तर सणासाठी वस्तू आणि कपड्यांच्या खरेदीसाठी महिलांसह लहान मुलांचीही किदवाई रोडसह बाजारपेठांमध्ये रीघ लागलेली असते विशेष म्हणजे मुंबईसारख्या शहरात ‘नाइट लाइफ’चा विषय चर्चेला आला त्यावेळी विरोधी पक्षासह विविध नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने शंका उपस्थित केल्या, मात्र मालेगावच्या पूर्व भागात रात्रीचा दिवस होत असून, सुरक्षिततेसाठी कोणताही अवास्तव बंदोबस्त लावावा लागत नाही. त्यामुळेच महिलावर्ग रात्री उशिरापर्यंत घरातून बाहेर पडू शकतात. त्याचमुळे मालेगावची ‘लाइफ स्टाइल’ मुंबईपेक्षाही फार पूर्वीपासून अशीच सुरू आहे.मुंबई-पुणेसारख्या शहरात रात्री सर्वत्र सामसूम असते; मालेगावात रात्री कितीही उशिरा प्रवासी बसमधून उतरला तरी त्याला हमखास रिक्षा मिळेल शिवाय रात्रीचा ‘चार्ज’ म्हणून इतर शहरात रिक्षाचालकांकडून जशी आर्थिक पिळवणूक केली जाते तशी पूर्व भागात रिक्षाचालक आर्थिकदृष्ट्या प्रवाशांना फसवत नाहीत.

टॅग्स :Nightlifeनाईटलाईफ