शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

नाशकात पुन्हा 'नाईट कर्फ्यू' ; सामान्यांनाही लवकरात लवकर लस द्या : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 19:19 IST

नाशिक शहरात गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज सरासरी दोनशे इतकी वाढली. कोरोनाचा फैलाव पुन्हा वेगाने होऊ लागल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

ठळक मुद्देनाशकात रविवारी (दि.२१) ३५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.शहरात २५४ तर ग्रामिण भागात ७५ आणि मालेगावात १६ नवे कोरोनाबाधित एकुण ४०७ कोरोना चाचणी अहवाल प्रगतीपथावर गोरज मुहुर्तावर 'शुभमंगल' सोहळे टाळण्याचे आवाहन

नाशिक : शहर व परिसरात मागील काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा नाशकात रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्याची घोषणा रविवारी (दि.२१) संध्याकाळी पत्रकार परिषदेत केली. तसेच शहरात मास्क न लावता वावरणाऱ्या बेफिकिर नागरिकांकडून मनपाच्या भरारी पथकांमार्फत १००० रुपयांचा दंड वसुल केला जाणार आहे. तसेच संबंधितांविरुध्द जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलिसांकडून केली जाणार असल्याचेही संकेत भुजबळ यांनी दिले आहे.नाशिक शहरात गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज सरासरी दोनशे इतकी वाढली. कोरोनाचा फैलाव पुन्हा वेगाने होऊ लागल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा मागील चार दिवसांत अचानकपणे वाढल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून पोलीस प्रशासनाकडून रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मास्क न लावता सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांना १ हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सध्या तरी शाळा, महाविद्यालये सुरुच राहणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे; मात्र कोरोनापासून बचावासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोरोनाने डोके वर काढण्यास पुन्हा सुरुवात केल्याने शहरात निर्बंध कडक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गोरज मुहुर्तावर 'शुभमंगल' सोहळे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लग्नसोहळे, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना लोंंढे येणार नाही, याबाबत खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही लवकरात लवकर लसीकरण उपलब्ध करुन देण्याची मागणीही भुजबळ यांनी यावेळी केली आहे.नाशकात रविवारी (दि.२१) ३५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये शहरात २५४ तर ग्रामिण भागात ७५ आणि मालेगावात १६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच रविवारी दिवसभरात १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यामध्ये शहरात १ तर ग्रामीण भागातील २ रुग्णांचा समावेश आहे. एकुण ४०७ कोरोना चाचणी अहवाल प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात एकुण १लाख १९ हजार ९५८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १ लाख १५हजार ९२५ रुग्ण उपचारादरम्यान बरे झाले आहेत. तसेच १ हजार १७६ कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयChagan Bhujbalछगन भुजबळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस