शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

निफाड @ 6.6, नीचांकी तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 14:48 IST

निफाड : हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तापमान तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर बुधवारी (दि. १९) ६.६ अंश इतके नोंदविले गेले.

निफाड : हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तापमान तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर बुधवारी (दि. १९) ६.६ अंश इतके नोंदविले गेले. मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असून, निफाडवासीयांना हुडहुडी भरली आहे. यावर्षीचे हे सर्वात नीचांकी तापमान होय.  सोमवारी दि. १७ रोजी कुंदेवाडी हवामान केंद्रात ७.२ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यानंतर थंडीचे प्रमाण वाढत जाऊन बुधवारी दि १९ रोजी ६.६ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाल्याने निफाडकर गारठून गेले . कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला. ही थंडी गहू ,कांदे पिकांना फायदेशीर ठरणार आहे, मात्र द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे ज्या शरद सीडलेस ,परपल, जम्बो या काळ्या जातीच्या द्राक्ष बागेतील मण्यात फुगवण होऊन पाणी उतरले आहे, अशा घडातील मणी तडकण्याचा धोका वाढला आहे. कारण या जातीच्या द्राक्ष मण्यांचे आवरण पातळ असत. जर ही थंडी वाढत गेली तर द्राक्ष मणी तडकण्याचे प्रमाण वाढून द्राक्षाचे उत्पादन कमी होण्याचा धोका वाढला आहे. ज्या द्राक्ष बागा फुगवणीच्या अवस्थेत आहेत. अशा बागांच्या द्राक्ष मण्यांची फुगवण थांबणार आहे तर उशिराच्या द्राक्ष बागेतील फुलोऱ्यातील मण्यांची फुगवण एकसारखी होणार नाही. थंडीचे प्रमाण वाढल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असून औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे . थंडीमुळे द्राक्षाच्या झाडांना ऊब देण्यासाठी शेतकरयांनी बागेत शेकोट्या पेटवल्या होत्या. थंडीमुळे द्राक्ष वेलींना अन्न पुरवठा करणाºया पेशींचे कार्य थांबण्याची शक्यता वाढल्याने शेतकºयांनी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले. थंडीचा कडाका इतका जास्त होता की दिवसभर वातावरणात गारवा जाणवत होता.

टॅग्स :Nashikनाशिक