नाशिकरोड : अखिल भारतीय कामगार संघटनांनी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये नाशिक शहरातील वृत्तपत्र विक्रेते काळ्याफिती लावून सहभागी होणार आहेत. देशपातळीवर वृत्तपत्रविक्रेता कल्याणकारी मंडळ तत्काळ स्थापन करावे, या प्रमुख मागणीसाठी संपाला वृत्तपत्रविक्रेता संघटनेने पाठिंबा दिला असून, या संपात सर्व वृत्तपत्र विक्रेते काळ्या फिती लावून सहभागी होणार आहेत. यानंतर विभागीय आयुक्त नाशिकरोड यांना निवेदन देण्यात येणार आहे. संपात सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक शहर वृत्तपत्रविक्रेता संघटना अध्यक्ष चंद्रकांत पवार, नाशिकरोड अध्यक्ष किशोर सोनवणे, नवीन नाशिक अध्यक्ष दत्तात्रय ठाकरे, सातपूर अध्यक्ष विनोद कोर आदिंनी केले आहे. (प्रतिनिधी)
वृत्तपत्र विक्रेते काळ्याफिती लावून करणार काम
By admin | Updated: September 2, 2016 01:04 IST