शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवोदितांनी कलाक्षेत्रात झोकून द्यावे :उत्तमराव पाचारणे :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 01:18 IST

आजच्या काळात अनेक माध्यमे उपलब्ध असून, नवोदित कलाकारांनी कुठल्याही कलेचे शिक्षण घेताना स्वत:ला झोकून द्यायला हवे, असे आवाहन नवी दिल्ली येथील ललित कलाअकादमीचे अध्यक्ष उत्तमराव पाचारणे यांनी केले.

ठळक मुद्देकलानिकेतनच्या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन

नाशिक : आजच्या काळात अनेक माध्यमे उपलब्ध असून, नवोदित कलाकारांनी कुठल्याही कलेचे शिक्षण घेताना स्वत:ला झोकून द्यायला हवे, असे आवाहन नवी दिल्ली येथील ललित कलाअकादमीचे अध्यक्ष उत्तमराव पाचारणे यांनी केले.शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात नाशिक कलानिकेतनच्या ७७व्या वार्षिक कलाप्रदर्शनाचे रविवारी (दि.१६) उत्तमराव पाचारणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाचारणे म्हणाले की, माध्यमे महाग असली तरीही हुकूमत असलेल्या शिक्षकांचा सहवास लाभल्याने जीवनात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचा अनुभव सांगतानाच मर्यादित ध्येय ठेवून शिक्षणास सुरुवात केल्यानंतरही कला शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यातूनही जीवनाच्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. व्यासपीठावर शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी, उपाध्यक्ष बापू गर्गे, चिटणीस दिनकर जानमाळी, प्राचार्य अनिल अभंगे आदी उपस्थित होते. यावर्षी कलाप्रदर्शनाच्या निमित्ताने चित्रकला क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी कोल्हापूर येथील ज्येष्ठ चित्रकार डॉ. नलिनी भागवत यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या कला प्रदर्शनात अ‍ॅबस्ट्रॅक्ट, पोट्रेट, लॅण्डस्केप, इंडियन आर्ट, क्रिएटिव्ह आर्ट, ग्राफिक आर्ट अशा १७५ हून अधिक चित्रांचा समावेश असून, नाशिककरांना शुक्रवार (दि.२०) पर्यंत या कलाविष्काराचा आस्वाद घेता येणार आहे. प्रास्ताविक प्रा. रघुनाथ कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. निशा पाटील यांनी केले. राजेंद्र ओढेकर यांनी आभार मानले.पारितोषिक विजेतेअखिल भारतीय कला प्रदर्शन २०२० मध्ये विद्यार्थी विभागातून सर्वोत्कृष्ट पेंटिंगसाठी चेतन पाटील यास सुवर्ण पदक, सर्वोत्कृष्ट पोट्रेटसाठी क्रिशिता सलियन हिला रौप्य पदक व लॅण्डस्केपसाठी राहुल सातपुते यास कांस्य पदक प्रदान करण्यात आले. तर व्यावसायिक विभागात सर्वोत्कृष्ट पेंटिंगसाठी किरण चौधरी यांना सुवर्ण पदक, सर्वोत्कृष्ट पोट्रेटसाठी सुरेश जांगिड यांना रौप्य व लॅण्डस्केपसाठी ज्ञानेश्वर डंबाळे यांना कांस्य पदक प्रदान करून गौरविण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकartकला