शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

नववर्षाचे स्वागत

By admin | Updated: April 8, 2016 23:30 IST

जल्लोष : जिल्ह्यात शोभात्रांसह मिरवणुका

सिन्नर : सनईचे मंगलमय सूर, त्याला मिळालेली टाळ-मृदंगाच्या गजराची साथ, संबळ-पिपाणीचा ठेक्यावर परंपरिक वेशभूषा केलेल्या नागरिकांची थिरकणारी पावले आणि त्यांच्यावर घराघरांतून होणारी पुष्पवृष्टी अशी मराठमोळी संस्कृती व परंपरेचा ठेवा जपाणारी शोभायात्रा येथे उत्साहात पार पडली.गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी बाणा व संस्कृती टिकविण्यासाठी येथील सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित शोभायात्रा कार्यक्रमास सिन्नरकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. सकाळी शिवाजी चौकात वंदे मातरम् संघटनेची २१ फूट उंच गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने पाडव्याचा सण व मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. घोटी : येथे गुढीपाढव्याच्या निमित्त मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कृष्णकुंज मित्रपरिवार व संताजी मित्रमंडळाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रा जनता विद्यालय ते जैन मंदिरमार्गे तेली गल्ली परिसरातून ढोल-ताशाच्या गजरात भगवान श्रीराम की जय घोषणांनी घोटी शहर दुमदुमले तसेच भगवेमय झाले होते. शोभायात्रेत भारतमाता देखाव्यासह परिसरात भीषण दुष्काळाचे सावट असल्याने ‘पाण्याचे महत्त्व’ देखाव्या भवती मांडण्यात आले होते. घोटी शहरात संताजी युवक मित्रमंडळाच्या वतीने श्रीकांत काळे यांनी १०१ गुढी विविध क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांना भेट स्वरूपात दिल्या. तेली गल्ली येथे संघपती नंदकुमार शिंगवी यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. याप्रसंगी ग्रामपालिका सफाई कामगारांना कपडे वाटप करण्यात आले. यामध्ये माजी आमदार शिवराम झोले, गणपतदादा कडू, बाबुलाल भोर, निवृत्ती पा. जाधव, उदय जाधव, कुलदीप चौधरी, रमेश काळे, विठ्ठल वालतुले, मोहन भगत, रामदास शेलार, समाधान जाधव, शरद हांडे, संदीप जाधव, हरिष चव्हाण, कैलास कस्तुरे, जगन भगत, बाळासाहेब भगत, अरुण सोनार, गणेश काळे, विठ्ठल काळे, जि. प. सदस्य अलका जाधव, तसेच संताजी युवक मित्रमंडळ व कृष्णकुंज मित्र परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते. (लोकमत ब्युरो)शोभायात्रेत सहभागी झालेल्या पाहुण्यांचा सन्मान मंडळाच्या वतीने श्रीकांत काळे यांनी केले.