शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कचरा विलगीकरणासाठी घंटागाड्यांचे नवीन डिझाइन

By admin | Updated: May 21, 2017 01:04 IST

नाशिक : महापालिकेने १ एप्रिलपासून शहरात ओला व सुका कचरा विलगीकरणास सुरुवात केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेने १ एप्रिलपासून शहरात ओला व सुका कचरा विलगीकरणास सुरुवात केली असली तरी घंटागाड्यांमध्ये त्याबाबतची प्रमाणित व्यवस्था नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळेच महापालिकेच्या आरोग्य विभागाने घंटागाड्यांमध्ये कचरा विलगीकरणासाठी नवीन डिझाइन तयार केले असून, आयुक्तांनीही त्यास पसंती दर्शविली आहे. त्यामुळे येत्या सोमवारी (दि.२२) आयुक्तांनी त्याच्या अंमलबजावणीकरिता घंटागाडी ठेकेदारांची बैठक बोलाविली आहे.महापालिकेने राज्य शासनाच्या निर्देशानुसार, शहरात घनकचरा विलगीकरणाची अंमलबजावणी सुरू केली असली तरी ती कागदोपत्रीच दिसून येत आहे. अद्यापही घंटागाडी ठेकेदारांकडून कचरा विलगीकरण होत नसल्याच्या तक्रारी आहेत. घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी कंपार्टमेंट करणे आवश्यक आहे. ठेकेदारांनी कंपार्टमेंटची व्यवस्था केली असली तरी ती प्रमाणित नाही. घनकचरा संकलनात बव्हंशी कचरा हा ओल्या स्वरूपात जमा होत असतो. परंतु, घंटागाड्यांमध्ये ओल्यासाठी २० टक्के तर सुक्यासाठी ८० टक्के असे कचऱ्याचे प्रमाण दाखविले आहे. शिवाय, गाडीच्या मध्ये सरळ दोन भागात कंपार्टमेंट न करता ते आडव्या पद्धतीने करण्यात आले आहे.