शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नवीन ३६ संशयित दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 00:34 IST

नाशिक : जिल्ह्यात शनिवारीदेखील तब्बल ३६ नवीन संशयित दाखल झाले असून, जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या एकाही नमुन्याचा अहवाल सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाला नव्हता.

नाशिक : जिल्ह्यात शनिवारीदेखील तब्बल ३६ नवीन संशयित दाखल झाले असून, जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या एकाही नमुन्याचा अहवाल सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाला नव्हता.शुक्रवारी नाशिक महानगरात दोन आणि मालेगावला एक असे तीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोेग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. विशेषत्वे मालेगावातून कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच नाशिक महानगरातील तीन कोरोनाबाधित हे शहराच्या तीन भिन्न भागातील असल्याने या तिन्ही ठिकाणचा परिसर सील करण्यासह ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण गावभर भटकणाऱ्यांचे प्रमाण बºयाच प्रमाणात आटोक्यात आले आहे.दरम्यान, शनिवारपर्यंत चौदा दिवसांचे सर्वेक्षण पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या ६२५ वर पाहोचली आहे, तर शनिवारी सर्वेक्षण करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या ४३७ असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी कोरोना संशयित १४, तर त्यांच्या नात्यातील बावीस अशा एकूण ३६ नागरिकांना दाखल करून घेण्यात आले असून, त्या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शुक्रवार आणि शनिवारचे नमुने मिळून तब्बल ११८ संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंतच्या नमुन्यांमधील ३०७ नमुने निगेटिव्ह आढळलेले असून, १६ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यापैकी दोन संशयितांचे निधन झाले असून, अनेक अहवालांची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे. त्यातील काही अहवाल शनिवारी रात्री, तर काही अहवाल रविवारपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.शहरात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेच्या वतीने पुरेशा उपाययोजना केल्या जात असतानादेखील कोरोना संशयितांची संख्या वाढत असून, शनिवारी (दि ११) एकूण १४ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. दरम्यान, नाशिक शहरात शुक्रवारी (दि.१०) सापडलेल्या दोन कोरोना बाधितांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या २१ व्यक्तींची विशेष तपासणी करण्यात येत आहे.मनपाच्या वतीने शहरात मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्यानंतरदेखील नाशिक शहरात एक बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर महापालिकेने बाधित रुग्णाच्या घरापासून तीन किलो मीटर परिसर सील केला असून, तेथे चौदा दिवस रहिवासींना बाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यांचे सर्र्वेक्षण, ट्रॅव्हल हिस्ट्री आणि आरोग्य विषयक तपासणी सुरू असतानाच शुक्रवारी आनंदवल्ली, नाशिकरोड येथील अशा दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महापालिकेने या भागातदेखील वैद्यकीय उपाययोजना सुरू केल्या आहेत. मनपाने शुक्रवारपर्यंत २६४ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले आहेत, तर त्यातील २३५ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाले आहेत. सध्या महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ३३ संशयित रुग्ण दाखल असून, अपोलो रुग्णालयात चार जण दाखल आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक