घोटी: आधुनिक जीवनशैलीत धावपळ वाढल्याने आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत. यासाठी न्यूरोथेरेपीचा अभ्यास अभ्यास जाणून घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन न्यूरोथेरेपिस्ट डॉ. मोहित पांडे यांनी केले. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्यशिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या शिबीरात ग्रामिण भागातून आलेल्या नागरिकांवर मोफत उपचार करण्यात आले.शिबीरात डॉ. विक्रमजीत सींग, डॉ.नागेश कुंबले, हेमंत सुराणा, आदींनी रूग्णांची तपासणी करून न्यरोथेरेपीद्वारे उपचार केले. दि.२४ जानेवारी हा न्यूरोथेरेपीचा वर्धापनदिन असतो. गेल्या वर्षीपर्यंत सूर्यमाळ येथील आश्रमात हा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. यंदा हा महोत्सव घोटीत करण्यात येणार आहे. गुरूवार दि.२४ व २५ जानेवारी रोजी होणाऱ्या या आरोग्य तंदुरूस्ती महोत्सवाचे उद्घाटन खासदार हरिषचंद्र चव्हाण करणार आहेत. यानिमित्त देशभरातील न्यूरोथोपिस्ट घोटीत येणार असून त्यांचे दोन दिवसांचे न्यूरोथेरेपी संमेलन घोटीत होणार आहे. घोटीतील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या यानिमित्त जाणून घेतल्या जाणार आहेत. घोटीतील प्राथमिक शाळेत न्यूरोथेरेपीसंदर्भात माहिती देताना विक्रमजीत सींग, डॉ. मोहित पांडे, नागेश कुंबले व हेमंत सुराणा
आधुनिक जीवनशैलीत न्यूरोथेरेपी काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 17:08 IST
घोटी: आधुनिक जीवनशैलीत धावपळ वाढल्याने आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत. यासाठी न्यूरोथेरेपीचा अभ्यास अभ्यास जाणून घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन न्यूरोथेरेपिस्ट डॉ. मोहित पांडे यांनी केले. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्यशिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या शिबीरात ग्रामिण भागातून आलेल्या नागरिकांवर मोफत उपचार करण्यात आले.
आधुनिक जीवनशैलीत न्यूरोथेरेपी काळाची गरज
ठळक मुद्दे मोहित पांडे- घोटीतील नागरिकांना मार्गदर्शन